कोरोनाने रोखली वारकऱ्याची वाट अनेक वर्षांची परंपराखंडित झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड

माजलगांव,प्रतिनिधी:- अवघे अवघे सारेजण ! घ्या विठुरायाचे दर्शन , जगात आहे भारी पंढरीचा वारकरी या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र तील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपुरातील विठूरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाऱ्या दिंड्यांची वाट यांदा कोरोनाने रोखली आहे जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने माजलगांव तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकऱ्यांची अनेक वर्षांची परंपरा थांबणार आहे . आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गावागावातून हजारो दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात रस्त्याच्या कडेने चालणारे वारकरी हातात भगवी पताका , गळ्यात टाळ मृदुंग , विठुरायाचा पादुका असणारी पालखी यासोबतच वारकऱ्यांचा मधुर कंठातून निघणारे भजनांचे सुरेल संगीत , मजल दरमजल करत अनेक गावातून गावागावात विठुरायाचा गजर करणारी दिसणार नसल्याने भाविकभक्तांचा हिरमोड झाला आहे .

कोरूना रोगाचा वाढता पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यंदा राज्यातील सर्वच देवस्थानांचेदारे बंद केली आहे कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ सुरु नसून गर्दी टाळण्यासाठी ही पावले उचलल्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरात जमणारा भाविकांचा महामेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे शिरपूर तालुक्यातून जाणाऱ्या शेकडो दिंड्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात जवळपास वीस एकवीस दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात आणि अनेक गावांमध्ये मुक्काम करून त्या गावांमध्ये रात्रीचा कीर्तन सोहळा पार पाडतात.

भक्ती रसात गाव रंगून जाते वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने गाव पवित्र होते यानिमित्ताने वारकऱ्यांना गावातूनच अन्नदाते पुढे येऊन जेवण देतात चहा नाष्टा सगळ्या प्रकारची सोय या वारकऱ्यांचे गावोगावी भाविक करत असतात . यंदा मात्र हे चित्र पाहायला मिळत नसल्याने वारकऱ्यांना आणि भाविकांना काही तरी चुकले चुकले सारखं वाटत आहे . विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांना यंदा या अमृतमय सोहळ्यापासून दूर राहावे लागणार आहे . कोरोना रोगाचे थैमान थांबावे यासाठी विठुरायाला अनेक वारकरी साकडे घालत आहे कार्तिकशुद्ध एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकऱ्याना तुझ्या दर्शनाला साठी येऊ दे त्यासाठी महाराष्ट्र कॉर्न मुक्त होऊ दे असे साकडे घालत आहे .

झरी येथील 3 रुग्ण बाधीत ; संपर्कातील अकरा जण रुग्णालयात

‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अ‍ॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedmajalgaon
Comments (1)
Add Comment