बीड, प्रतिनिधी – बीड जिल्हा रुग्णालय कोरोनाबाधीत रुग्णांसाठी खाली करण्यात आल्याने या ठिकाणी मिळणाऱ्या इतर सर्व सुविधा आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालय नाळवंडी नाका बीड येथे हलविण्यात आले आहे , अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अशोक थोरात यांनी प्रसिध्दीपत्रकामार्फत दिली आहे . डॉ.थोरात म्हणाले , कोरोनाच्या रुग्णांपासून सुरक्षीत अंतरावर राहण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य सेवाही आदीत्य आयुर्वेदिक महाविद्यालयात हलविण्यात आल्या आहेत . रुग्णालयात येणारांनी या स्थलांतरीत ठिकाणी जाऊन सेवा घ्यावी , असेही अवाहन डॉ.थोरात यांनी केले आहे .