पालम : ग्रामीण रुग्णालय पालम येथे कोरोना या विषाणू वजा महाभयंकर महामारी (कोविड 19) विषयी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांनी पालम तालुक्यातील जनतेस असे आवाहन केले की जनतेने अत्यंत आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे. एकमेकापासून एक मीटरचा अंतर ठेवून दैनंदिन व्यवहार ठेवावेत, आपल्या स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, अफवेवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सिद्धार्थ भालेराव यांनी बैठकीत केले.
या बैठकीस सिद्धार्थ भालेराव, वैद्यकीय अधीक्षक पालम ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर नीरज, तालुका अधिकारी डॉक्टर विनायक स्वामी, वैद्यकीय अधिकारी प्रेम कुमार द्रोणाचार्य, कपिल करवदे, डॉक्टर पाठक मॅडम, नीरज मुरोळे अविनाश हनवते, शेख खाजा भाई, सेवक आदी उपस्थित होते