– जिल्हा रुग्णालयात १६७८ संशयितांची नोंद
– आज रोजी १०१ संशयित दाखल झाले
परभणी – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णासंबंधीची वैयक्तिक माहिती ही गोपनीय स्वरुपाची असल्यामुळे अशी माहिती व इतर संवेदनशील माहिती सोशल मीडियावर पसरविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली.
जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज असुन खबरदारीचा भाग म्हणुन सर्व प्रकारच्या अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी अफवांवर विश्वास ठेवुन घाबरून जाऊ नये तसेच कुठल्याही अफवांना बळी पडु नये. असे आवाहनही जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
सद्यस्थितीत आजपर्यत जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह एकुण १६ रुग्णांपैकी १५ रुग्ण वैद्यकिय निगराणीखाली असून सर्व रुग्ण औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद देत आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर एक रुग्ण यापुर्वीच कोरोनामुक्त झालेला आहे. परभणी जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे १ हजार ५७७ व आज रोजी दाखल झालेले १०१ असे एकुण १ हजार ६७८ संशयितांची नोंद झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह स्वॅब अहवालानुसार यापुर्वीच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव , गंगाखेड तालुक्यातील नागठाणा व पुर्णा तालुक्यातील माटेगाव तसेच परभणी तालुक्यातील पिंपळगाव हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यालयामार्फत पथक तयार करण्यात आले असून सील केलेल्या परिसरातील प्रत्येक घरात सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
चालू होणाऱ्या जिनींग बंदच; नेत्यांची मात्र श्रेयासाठी चढाओढ
नुतन आयुक्त देविदास पवार यांनी पदभार स्विकारला
क्वारंटाईनच्या नावाखाली गावागावात राजकारण; गरीब शाळेत तर श्रीमंत घरी