कोरोना रुग्णसंख्येची पाऊले पाच शतकाकडे

नांदेड, प्रतिनिधी – एकदिवसीय नोंदीचा रेकॉर्ड मोडीत काढत (ता.०६) सोमवार व (ता.७) मंगळवार रोजी संध्याकाळी प्राप्त प्रसिद्धी अहवाला नुसार १६ व नंतर प्राप्त झालेल्या अधिकृत संदेशाद्वारे २६ रुग्ण असे दोन दिवसात तब्बल एकूण ४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत,तर यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे,यामुळे आजवरील एकूण बाधितांची संख्या ४८४ झाली आहे,तर आज ०१ रुग्ण बरा झाला असल्याचे समजते.

यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे,आज २ रुग्ण दगावले आहेत यामुळे मृत्यूची संख्या २२ झाली आहे.

आज मंगळवार रोजी प्राप्त अहवाला नुसार
कंधार विकास नगर – २ पुरुष (वय ७२,३९)
मुखेड दत्तात्रय नगर – १ पुरुष (वय ५२) व २ महिला (वय ३५, ६८)
मुखेड दापका – १ पुरुष (वय १०)
मुखेड पोलिस कॉलनी – १ पुरुष (वय ३०)
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे – १ महिला (वय ३६)
कंधार पंरढा – १ महिला ( वय २३)
नवा हस्सापुर नांदेड – २ पुरुष (वय ४७, ०६) व २ महिला ( वय ०२, ५०)
उमर कॉलनी नांदेड – ३ पुरुष (वय ४, ३४, ६१)
बालाजी नगर तरोडा – ५ पुरुष (वय ०५, २५, ३०, ५८, ०५), व २ महिला (वय ३४, ५५)
पिरबुऱ्हान नगर नांदेड – १ महिला (वय १८)
देगलूर नाका नांदेड -१ महिला (वय ४२)
पळसा हदगाव – १ पुरुष (वय २५)
असे सायंकाळी २६ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे…

आज पहाटे अडीच वाजता इतवारा येथील ८३ वर्षीय पुरुष कोरोना रुग्णांचा आणि दुपारी २ वाजता बळीरामपुर येथील ६० वर्षीय पुरुष कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला,यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२ झाली आहे…

कोरोना बाधीत एकूण संख्या :४८४
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ३३५
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण : १२७
मृत्यू पावलेले एकूण रुग्ण : २२

“मिशन ब्रेक द चैन”; नियम भंग करणाऱ्यांवर होणार आता कठोर कारवाई
स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?



Comments (0)
Add Comment