कौळाने – राज्य शासनाच्या उपक्रमा अंतर्गत नांदगांव मतदार संघातील कौळाने ता. मालेगांव येथील पाटोदीया जिनिंग येथे हमी भावात कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना कापूस खरेदी केंद्रावर नांदगांव व मनमाड परिसरातील सर्व शेतक-यांचा कापूस खरेदी केला जाईल अशी ग्वाही आमदार सुहास आण्णा कांदे यानी दिली.
यावेळी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, संचालक संग्राम नाना बच्छाव, विकिदादा खैरनार, डीडीआर शिंदे, डीडीआर बलसाने, ए आर बदनाळे, ता. प्रमुख संजयजी दुसाने, विष्णू पाटोदिया, महेश पाटोदीया, आबा देवरे, राजु पवार, भरत पवार आदींसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
परभणीत जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू; केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा – जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});