- विध्यार्थी व गावकऱ्यांकडून अतिक्रमण हटविण्याची मागणी
- शेणखत व तनसीच्या ढिगाऱ्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात
शंकरपूर, प्रतिनिधी – येथून पाच किलोमीटर असलेल्या आंबोली येथे खेळण्याच्या मैदानावर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले असुन हे खेळाचे मैदान शासकीय असून गावातील शाळेतील वर्षातून होणारे खेळ घेण्याकरता राखीव ठेवली गेली असल्यामुळे अनेक वर्षा पासून या मैदानावरती प्राथमिक शाळेचे,व हायस्कुलच्या मुलांचे खेळ होतात व परिसरातील मुले या मैदानावरती क्रिकेट, कबड्डी, खोखो व सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे खेळ नेहमी खेळत असतात.
विशेष म्हणजे या मैदानावरती दरवर्षी बैलपोळा हा सन साजरा होत असतो मात्र मागील काही दिवसांपासून या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण केले असून मैदानावरती खात, बैलाचे शेन ,घरातील केरकचरा ,तनसीचे ढिगारे असल्यामुळे खेळ कुठे खेळायचं असा प्रश्न युवकांना व विद्यार्थ्यांना पडला आहे याच मैदानावर गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी असून तिथुनच पाण्याची पाईपलाईन गेली असल्यामुळे पावसाळा सुरू असल्यामुळे दूषित पाणी होऊन गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे अतिक्रमण हटवण्याची मागणी गावऱ्याकडून होत आहे मात्र या अतिक्रमनाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय ; ‘अशा रीतीने होणार गुण निश्चिती’
एमआयडीसीचा राज्यातील उद्योगांना दिलासा विविध शुल्क आकारणीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नोकरी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा