आजच्या परिस्थितीत गरिबांच्या आयुष्यात काही वेगळच घडतय .जें की गरीबीत जीवन जगताना फार विचित्र आणी खरतड प्रवासातून आयुष्य सावरण्यासाठी अनेक संकटाना तोंड द्यावं लागतय.
गरिबी म्हणलं की दुःख आणि दारिद्र्य आलाच यात गरिबांच्या जगण्याला या दोनी ने घेरून टाकलेल .घरात दुःख अन दारिद्र्य हे गरिबांना खूपच सतावत .कधी कधी अनेकांना वाटय की या गरिबीतून मुक्त व्हाव एकदाच, असं वेगळ काही तरी करुन, पण जेंव्हा परिवाराच प्रश्न येतो तेंव्हा वाटत, नाही नको आपन हें चुकतोय, का उगाच लेकरा बाळांना वार्यावर सोडून जायचं, त्यांना अन्नपाण्या विना का वणवण फिरवायच, अनेक गरीब व्यक्ती फ़क्त हा विचार करून जीवन जगत असतात. एकदा नकीच काळ बदलेल ही स्वप्न मनी बाळगून ते स्वतःच आयुष्य काढत असतात. या गरिबीत खुप चटके हें सहावे लागतात, कारन गरीबी म्हणलं की त्यांच्या मदतीला कुणी हि फिरकत नाही, प्रेत्यकच ठिकाणी त्यांची हेडाळनी होते.
अश्या आयुष्यात काही तरी करन्याची वेळ प्रेत्यकाला सतावते. परंतू करावं तरी काय अता ना घरी बसतायेत ना बाहेर जाता येत. सरकार मदतीला खंबीर पणे उभं य स्वतः अन्यधान्य चा पूरवठा सरकार मोफत करतय, पण काही ठिकाणी गरीबांचे स्वतः राशन देखील, दुकानदार विकण्याचा प्रयत्न करतात, सरकार च्या मोफत योजना देखील विकतायत. खरच आशा संकटात एकमेकांनी एकमेकांची मदत करयला हवी. रुपया हा अता काही येवढा मोठा वाटत नसल कुणाला, पण त्यां एक एक रुपया साठी गरिबांचे काय काय हाल होतात हें त्यालाच काळतय रुपयाची देखील त्याच्यापुढं अफाट किंमत आहे.
सद्यस्थितीत महामारी संसर्ग हा एवढा भयंकर वाढत आहे. अन त्याचा परीणाम देखील गरीब व्यक्ती वर तश्या च भयानक प्रांमाणात होतं आहे. शेतकरी असो वा शेतमजूर दोघांना ही याचे चटके सहन करावे लागतात महामारी शहरात होती तोपर्यन्त ठीक होतं पण अता ती तालुक्यात अन गावात देखील आली आहे, अश्या संकटात गरीब व्यक्ती ना नेमके करावं काय हे कळायना झालं सारख झाले आहे. रोज कुठेतरी काम केलं तर भाकरी मिळते अश्या गरीब व्यक्तीचे ही प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे रोगाने त्यांच फिरणंच बंद नव्हे खाणं ही बंद केल्यासारखे वाटू लागलंय, केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक योजना मार्फत गरीब व्यक्ती ना सावरण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे ते काही प्रमाणात यशस्वी देखील होतं आहेत. अता गरीबा च्या आयुष्याला फ़क्त ही रोगाचीच कीड आहे जेंव्हा हें सर्व काही सुरुळीत होईल तेंव्हा गरीबी ला व बेकारी आनी बेरोजगारी ला नक्कीच आळा बसेल.
या महामारी चा जेंव्हा सगळा नास होईल तेंव्हा सर्व क्षेत्रातील बेकारी अन बेरोजगारी जान्यास नक्कीच मदत होईल, अन बेकारी व बेरोजगारी संपली की गरिबीला ही काही प्रमाणात आळा नक्कीच बसेल.
अंगद दराडे
माजलगाव बीड
8668682620