माणगांव, विश्वास गायकवाड – विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या या अधुनिक युगात माणसाने सर्व क्षेत्रात प्रगती करून उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येकाची लाईफस्टाईल चेंज झाली आहे. बदलत्या युगा बरोबर माणसाने स्वतः मध्ये कालानुरूप बदल घडवून आणले. सद्याच्या या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनाचा मानवी शरीरावर आणि त्याच्या एकूणच जीवनशैलीवर परिणाम झालेला दिसून येतो आहे. या मध्ये प्रामुख्याने सांगायचे तर मानवी मनावरील मानसिक ताण तणाव, आहार, विहार, आर्थिक विवंचना आणि आयुरारोग्य इत्यादी कारणांमुळे मानवी जीवनात उद्भवणार्या शारीरिक समस्या या मध्ये अकाली केस गळणे, केस पांढरे होणे इत्यादी समस्यांना सद्या सर्वांना सामोरे जावे लागत आहे.
सद्याच्या परिस्थितीत मानवी जीवनातील मधील प्रमुख समस्या म्हणजे अकाली केस पिकणे म्हणजे केस पांढरे होणे या समस्येने सद्या सर्वांना ग्रासले आहे. या समस्येवर उपाय म्हणून सद्या बाजारात मिळणारी गोदरेज हेअरडाय या हेअरडाय च्या वापरामुळे समाजातील अनेक वयोवृद्धांना चीर तारुण्याचे वरदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे अलिकडे समाजातील वयोवृद्ध व्यक्ती निसर्ग नियमाच्या नियत वयोमानानुसार केस पांढरे होऊन वृद्ध झाल्याचे नैसर्गिक संकेत दिसून येत नाहीत. कारण ते न चुकता वारंवार आपल्या डोक्यावरील व दाढीचे पांढरे केस लपवण्यासाठी त्यांना सलून मध्ये जाऊन हेअरडाय करून घेतात त्यामुळे ते वयोवृद्ध असूनही नेहमीच चीर तरूण दिसतात. मात्र सध्या शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लाॅकडाऊन मुळे बाजारातील सर्व हेअर कटिंग सलून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व वयोवृद्धांचे चीर तारुण्य गेले आणि त्यांचे पांढरे केस आणि पांढर्या दाढ्यांच्या माध्यमातून निसर्ग नियमाने नैसर्गिक खरे स्वरूप जगासमोर आले आहे.
परभणी जिल्ह्यातील …….. हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित