हिंगणघाट ,प्रतिनिधी – शहरातील नेहरू शाळा येथील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण तसेच ऍन्टीरेबिज लसीकरण मोहिमेअंतर्गत कालपासुन सुरु शस्त्रक्रिया शिबिराच्या ठिकाणी सुरु असलेला गैप्रकार निदर्शनास आला. वर्धा येथील सर्वोदय गोशाला चैरिटेबल ट्रस्ट व स्थानिक नगरपालिका यांच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्राणीमित्र आशिष गोस्वामी यांच्या कारवाईमुळे आज शस्त्रक्रिया शिबिराचे काम पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. प्रस्तुत शिबिरामधे भ्रस्टाचार होत असल्याची माहिती मिळाल्याने वर्धा येथील प्राणीमित्रआशिष गोस्वामी घटनास्थळी पोहोचले.
श्री गोस्वामी यांनी गैरप्रकार सुरु असल्याचे सांगताच स्थानिक नगरपालिका प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदार यांचा गैरप्रकार दिसुन येताच संदर शिबिरास स्थगीत करण्यात आले .
जिल्हात प्रान्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरुध्दात काम करणार्या पिपल्स फाॅर अॅनिमल्स या संस्थेचे सचिव तसेच प्राणी क्लेश समिती चे सदस्य आशीष गोस्वामी यांनी आज दुपारी भेट देत या शिबीरातील अनियमिततेचा पर्दाफाश केला . जिल्हा अधिकार्याच्या नाविन्य पुर्ण योजने अंतर्गत जिल्हेयातील सर्व नगरपालिकाना भटक्या कुत्राच्या निर्बिजीकरणा साठी बारा लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला
या पैकी दोन लाख रुपये स्थानिक नगरपालिकेला अनुदान देण्यात आले या नुसार सदर कामाकरीता वर्धा येथील सर्वोदय गोशा चॅरीटेबल ट्रस्ट या गोपालन करणारेर्या संस्थेस निविदे द्वारे देण्यात आले.काल या निर्बिजीकरण व अॅन्टीरेबीज लसीकरण शिबीरा अंतर्गत शंभर भटक्या श्वानांवरती शस्रक्रिया व लसिकरण करण्याची सुरवात केली.
श्री गोस्वामी याच्या उपस्थीतीत पत्रकारानी माहिती घेतली असता तिस शस्त्रक्रिया केल्याची माहिती देण्यात आली पंरतु शस्त्रक्रिये नंतर या श्वानाचे टेस्टीस खड्डयातुन काढुन मोजमाप केले असता फक्त विसच टेस्टीस आढळले. शस्त्रक्रीया मान्यताप्राप्त शल्यक्रीयागृह ठिकाण सोडुन स्थानिक नगपालिकेच्या नेहरु प्राथमिक शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
श्री आशिष गोस्वामी व त्यांचे सहकारी कौस्तुभ गावंडे यांनी अनेक बाबींवर आक्षेप घेतल्याने उपस्थीत पशुवैद्यक डाॅ अदीरुप सिरसाट ,कंत्राटदार पंचभाई , आरोग्य निरीक्षक विजय खोब्रागडे निरत्तर झाले
अनेकवेळा संपर्क साधुनही न .पा. मुख्याधिकारी अनिल जगताप घटनास्थळी पोचले नाहि .सदर प्रकरण गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी श्री भिमनवार , उपविभागीय अधिकारी खंडाईत, यांचेसह थेट मेनका गांधी याचे कानावर घातले. सदर कारवाईनंतर आज शहरात सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होती.
” सुरगाणा” तालुक्याला निसर्गाने बहाल केली सुंदर निसर्ग सौंदर्य देणगी…
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});