सरपंच यांना सहा महिने मुदत वाढ किंवा जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास प्रशासक पदी नियुक्ती करण्याची भारतीय जनता पार्टी ची मागणी
हिंगणघाट,प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तालुक्याच्या वतीने उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्यात ग्रामीण विकास मंत्रालय द्यारे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रशासक पदी कार्यकर्त्यांची नियुक्ती चुकीचा अध्यादेश काढून करण्यात आली असून ,हा अध्यादेश तात्काळ रद्द करून सरपंचाची सहा महिने मुदतवाढ ही जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास प्रशासक पदी नियुक्ती करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी च्या वतीने दिलेल्या निवेदनात covid-19 च्या दरम्यान सरपंचांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला होता.आता त्याच योद्ध्याला पदावरून बाजूला सारून त्याच्याजागी आपल्या मर्जीतील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला पालकमंत्री आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निवड करावी हा कोरोना त योध्यांचा अपमान आहे म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करतो.
सध्या अस्तित्वात असलेल्या 14000 ग्रामपंचायतीचा त्या सरपंचांना सहा महिने मुदतवाढ दिल्यास covid-19 च्यामहामारी चे संक्रमण रोखण्यास मदत होईल त्याचप्रमाणे हे शक्य नसल्यास जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या कर्मचारी विस्तार अधिकारी तसेच विविध खात्यातील कर्मचारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक केल्यास होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहार झाल्यास जबाबदार धरता येईल परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोय म्हणून प्रशासक नेम ल्यास गावात विनाकारण वाद निर्माण होतील व गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
हे निवेदन देताना भाजपचे वर्धा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा परिषद सभापती माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे, प. स.सभापती शारदा आंबटकर, पंचायत समिती माजी सभापती गंगाधर कोल्हे , तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे विनोद विटाळे, नितीन वाघ अमोल बुरले प्रविण बोकडे योगेश बोंडे यशोदा वानखेडे तुषार आंबटकर पल्लवी कामडी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});