चर्मकार समाजाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्यांना कडक शिक्षा करा-नानासाहेब घोडके

माजलगांव, प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील यावल ता.यावल येथील चर्मकार समाजातील एका मुलीचा विनयभंग करूनमुलीच्या चुलत भावाला मारहाण करत त्याचे सोन्याचे ब्रासलेट लुटून नेणाऱ्या गुंडांना कडक शिक्षा करण्यात यावी. तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे.अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी केली आहे. या विषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात घोडके यांनी म्हटले आहे की, २२एप्रिल बुधवार रोजी नगर जिल्ह्यातील यवलाजळगाव येथील संतरोहिदास नगर भागात चर्मकार समाजातील मुलगी आपल्या घरोसमोरील ओट्यावर सावलीत लहान भावाला खेळवत बसल्याली असताना समोरच्या ओट्यावर रोहन खाटीक, सय्यद खाटीक, शारुख खाटीक, मुजाहिर खाटीक, अजहर खाटीक, अस्लम खाटीक. बसलेले असताना सदर मुली कडे पाहत अश्लील चाळे करत लज्जा वाटेल असे कृत्य करून शिट्ट्या वाजवत असताना मुलीच्या भावाने त्यांना समाजावण्याचा प्रयत्न केला असता त्यास जातीवाचक शीवीगाळ करून हुज्जत घालत इतर ८ते१०जणांना फोन करून बोलावून घेतले आणि मुलीच्या हाताला धरून ओढाओढ चालू करुन तीचा लहान भाऊ व चुलत भाऊ यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून चुलत भावाचे सोन्याचे ब्रासलेट लुटले. यानंतर संबंधीत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण ते आरोपी दहशत निर्माण करून पिडीत मुलगी व तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवीतास धोका निर्माण करण्याची दाट शक्यता असल्याने त्या गुंडांना कडक शिक्षा करून पिडीतांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात येऊन न्याय मिळवून द्यावा
अशी मागणी नानासाहेब घोडके यांनी केली आहे.

Comments (0)
Add Comment