नेवासा, अमोल मांडण – चांदा येथे कत्तलखान्यावर सोनई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन आरोपीवर गुन्हा दाखल करत सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करून १० जनावरांची सुटका करून मढी येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे. सोनई पोलीस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार चांदा येथील शास्त्रीनगर गाढवे वस्ती जवळ एका टॅम्पोत जनावरे भरुन औरंगाबादच्या कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून सोनई पोलिसांनी, त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी विविध रंगाची व वयाची १ लाख ५३ हजाराची दहा जनावरे व ४ लाख ५० हजार रुपयाचा अशोक लेलंडचा टेम्पो क्र. एम एच २० ई एल ७८३३ असा एकुण ६ लाख ३ हजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पसार झालेला जनावरांचा मालक अताऊला शब्बीर पठाण रा.चांदा ता.नेवासा व टेम्पो वरील अज्ञात चालक याचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि. क्र. ३००/२०२१ महा प्राणी संरक्षण सुधारीत आधी १९९५ चे कलम ५(ब)(क)सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रति कायदा १९६० चे कलम ११ सह मो.वा.का.क. १९२(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जनावरांना तातडीने सुरक्षा, देखभाल व संवर्धन पालनपोषणासाठी जय गोमाता सेवाभावी संस्था वृद्धेश्वर मढी ता पाथर्डी येथे पाठविण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व सुदर्शन मंुढे ,उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग,शेवगाव यंाचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.कर्पे,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पो.हे.कॉ अडकित्ते, पो.ना.बाबा वाघमोडे, पो.ना माने, पो.ना.मुळे,पोकॉ गर्जे यांनी केली आहे.