माजलगांव ,प्रतिनिधी : – बीड – परळी महामार्गालगत चाटगाव जोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे प्रतीक देशमाने फाऊंडेशन या संस्थेने निवेदनाद्वारे केली आहे.
धारूर तालुक्यातील चाटगाव जोड रस्त्याची दुरवस्था झालेली असून या ग्रामस्थ आणि वाहनधारकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाबाबत सामाजिक क्षेत्रात नव्याने उतरलेल्या प्रतीक देशमाने फाऊंडेशन या संस्थेने आमदार प्रकाश सोळंके यांना निवेदन देऊन याबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात प्रतीक देशमाने फाऊंडेशनचे अध्यक्ष बालासाहेब हांगे, सचिव बाबा देशमाने, उपाध्यक्ष दीपक गडसिंग यांचा समावेश होता.
आर. टी. देशमुखांनी दिली केवळ आश्वासने
चाटगाव जोड रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या कार्यकाळात केवळ ग्रामस्थांना आश्वासने देण्यात आली. मात्र आता विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे या रस्त्याचे काम मार्गी लावतील, असा विश्वास प्रतीक देशमाने फाऊंडेशन संस्थेचे सचिव बाबा देशमाने यांनी व्यक्त केला आहे. चाटगाव जोड रस्त्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी शंकर चौरे, माणिक सांगळे, दीपक गडसिंग या ग्रामस्थांनी केली आहे.
मूळ चाटगाव येथील रहिवाशी प्रतीक देशमाने हा इयत्ता नववीतील इंग्लिश माध्यमात शिक्षण घेणारा विद्यार्थी अतिशय हुशार होता. तो मस्क्युलर डीस्ट्रोपी या दुर्धर आजाराशी झुंजत असताना गेल्या २ नोव्हेंबर २०१९ रोजी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या स्मृती टिकविण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रतीक देशमाने फाऊंडेशन या संस्थेने काम सुरू केले आहे. केवळ सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत राहणार आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});