छत्रपती राजर्षी शाहू महाराज, कृतीशील, प्रगतीशील, परिवर्तनशील राजे

सामाजिक न्याय दिन चिरायू हो…!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा ज्यांनी समर्थपणे चालवला. आपल्या राजसत्तेच्या माध्यमातून हजारो वर्षे अंधार कोठडीत खितपत पडलेल्या दिन-दलित, शोषीत- उपेक्षित समजाला प्रकाशवाटेवर घेऊन जाणारा दिपस्तंभ.थोर समाजसुधारक कृतीशील व प्रगतीशील ,प्रजाहितदक्ष , ,आरक्षणाचे जनक, भारतातील वस्तीगृहाचे अद्य जनक “लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (shahu maharaj) यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः सर्वाना हार्दिक शुभेच्छा..व छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना “विनम्र अभिवादन “…!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व अस्पृश्य समाजाला त्याकाळीच (1920) सालीच सांगितले होते की छत्रपती राजर्षी शाहू महाराजचा वाढदिवस हा ‘सणा’ सारखा साजरा करा. आता महाराष्ट्र शासन हि शाहु माहारांजाची जयंती हि “सामाजिक न्याय दिन ” म्हणून साजरी करत.

He has king but Democratic King अस गैरव उद्दगार माधवराव बागल यांनी केलेले आहे. तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी “महाराष्ट्रच्या विकासाचा स्वाभाविक तरंग म्हणजे शाहू महाराज असे संबोधले आहे .महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी त्यांना शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरविले. शाहू महाराज हे संस्थानिक राजे असताना त्यांनी त्यांच्या संस्थानात ऐवढी लोकाभिमुख व सामाजिक उद्धाराची कामे केली. म्हणजे सामाजिक,समता व बंधुता आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली. म्हणून त्यांना Democratic King असे म्हटले जाते.

शाहू महाराजांनी (shahu maharaj) विविध क्षेत्रात मोलाच काम केलेले आहे यामध्ये तत्कालीन प्रथापित समाजव्यवस्थेतील उच्चवर्णीयांची मक्तेदारी संपवण्यासाठी बहुजन समाजाला शिक्षणा वाचून पर्याय नाही हे महाराजांनी जानले होते. ” ज्ञान हिच शक्ती” या ब्रीद वाक्यचा अंगीकार केला आणि संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. आणि आम्ही देश स्वतंत्र होऊन आणि लोकशाही येऊन 70 वर्षे झाली आता कुठ 2010 साली मनमोहन सिंगजीच्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. पण त्यांची अजुन ही अमलबजावणी निट होत नाही. शाहू महाराजांनी विद्यार्थीसाठी वेगवेगळी वसतीगृह स्थापन केली व यामध्ये सर्व जातीधर्मीची मुल राहत होती.

आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना फी माफ, मोफत कपडे भोजन वैद्यकीय उपचार सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्यात येत होती. म्हणूनच तर कोल्हापूरला वस्तीगृहाच शहर आणि महारांजाना ‘भारतीय वस्तीगृहाचे ‘ अद्य जनक’ म्हटले जाते. महाराजांनी ‘शिक्षण कर ‘कायदा केला यातुन शिक्षणासाठी, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी खर्च केला जात असे. तसेच महारांजानी स्त्री शिक्षणासाठी ‘राधाबाई अक्कासाहेब महाराज व नंदकुमार भावनगर स्कॉलरशिप सुरू केल्या. तसेच तलाठी व पाटिल शाळ,राजाराम महाविद्यालय,शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कुल, डेक्कन रयत शिक्षण संस्था, तांत्रिक शिक्षणासाठी जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट ,व्हिक्टोरिया मराठा , मिस क्लार्क वसतीगृह अशा विविध शिक्षणसंस्था व वसतीगृह त्यांनी स्थापन केले.

या भारता मध्ये “राजा असो वा रंक” प्रत्येकाला जात व जातीयतेचे चटके बसतात. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना तूम्ही क्षेत्रीय नाहीत म्हणून त्याचा राज्याभिषेक करण तिथल्या तथाकथीत पुरोहितानी नाकारल व काशीच्या गंगाभटाला भरमसाठ पैसा देऊन तो करून घ्यावा वागला. तसेच छत्रपती शाहू महाराजांना सोबत वेदोक्त प्रकरण घडल. 1899 साली महाराज कार्तिकी स्नानासाठी पंचगंगा नदीवर जात .एकेदिवशी महारांजानी पुरोहिताला विचारल की तु संकल्प सांगण्यापूर्वी स्नान का करत नाही..? पुरोहीत म्हटला की तुम्ही क्षत्रिय नसुन शुद्र आहात ; तेव्हा मी वैदिक मंत्र म्हणत नाही, मी पुराणोक्त मंत्र म्हणतो.

व त्यासाठी स्नानाची गरज नसते. ” हि गोष्ट महाराजांच्या मनाला लागली. एक राजा असुन वैदिक मंत्रोच्चार म्हणत नाहीत. व व्यक्तीगत अपमानापेक्षा, वेदोक्ताचा समान अधिकार ब्राह्मणेतरांना नाकारला जावा, याच दुःख त्यांना बोचत होत. हे प्रकरण घडल्यामुळे महारांजाच्या व्यक्तिमत्त्वाला व कार्याला सामाजिक क्रांतीचे परिणाम प्राप्त झाले. आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ गतिमान झाली. महाराजांनी या प्रकरणानंतर ‘क्षात्रजगदगुरुपीठाची’ निर्मीती केली. त्यांचे प्रमुख म्हणून सदाशिवराव बेनाडीकर यांची नियुक्ती केली. येथून खऱ्या अर्थाने माहारांजाच अस्पृश्य निवारणासाठीच काम अधिक गतीने सुरू झाला.

महाराज म्हणत की “जातीभेद समाजघातकी आहे, तो राष्ट्रलाही विघातकी आहे. शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीच जातीभेद अस्पृश्यता पाळली नाही. त्यांनी सनातन्यांचा विरोध केला. अस्पृश्य ,भटके, विमुक्त गोरगरीब व समाजव्यवस्थेतील दुर्लक्षित घटला सामाजिक ,आर्थिक , न्याय मिळवून दिला. त्यामुळेच महाराष्ट्र शासन हा दिवस “सामाजिक न्याय दिन “म्हणून साजरा करत.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजातील लोकांना आपल्या संस्थांना नोकर्‍या दिल्या. जे शिकलेले नव्हते त्यांच्या साठी स्वतःचे अंगरक्षक व संरक्षक, व दरबारात जरीचा पेटा, तलावर देऊन मानकर्याच्या रांगेत बसवले .जे शिकलेले होते त्यांच्या साठी कारकून, रजिस्टर व विविध मोठ्या पदाच्या जागा दिल्या. आणि ऐतिहासिक निर्णय घेतला व तो 1902 मध्ये की ” संस्थांना मागासवर्गीय जातील लोकांना 50% आरक्षण देण्याचा कायदा व वटहुकूम काढला. म्हणून महाराजांना “आरक्षणाचे जनक ” म्हणतात.कुलकर्णी वतने जप्त करून कोतवालाची नेमणूक केली. बहुजन समाजातुन तलाठ्याच्या नेमणूका केल्या.

संस्थानात वेगवेगळे कायदे केले यामध्ये “अस्पृश्यता पाळणे” हा कायद्यान गुन्हा आहे व आपल्या संस्थानातील सर्व विहरी,तळे, मंदीर अस्पृश्यसाठी मोकळे केले. 1917.साली विधवा पुर्न विवाहाचा कायदा पास केला. बालविवाह वर बंदी घातली. संस्थानात मिशन हॉस्पिटल सुरू केले. व जे डॉक्टर अस्पृश्यना इंजेक्शन देत नाहीत अशा डॉक्टर कारवाई केली. आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली व तसा कायदा ही केला.आणि आपल्या घराण्यातील मुलीचा विवाह सोहळा हा होळकर घराण्यातील राजपुत्र सोबत लावून दिला.

बलुतेदारी बंदी कायदा केला. जो हा कायदा मोडेल त्याला 100 रू दंड व कारावासाची शिक्षा केली गेली.
आर्य समाज, सत्यशोधक समाजाचे पुर्नजीवन केले. महाराजांनी वेगवेगळ्या परिषदेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हो यामध्ये माणगाव, नागपूर, आणि दिल्ली येथे झालेल्या परिषदेला उपस्थित होती. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी ‘दक्षिण भारतातील पहिली बहिष्कृत समाजाची परिषद’ भरवली. त्यामुळे २१ मार्च आणि २२ मार्च हे परिवर्तनाच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. या वर्षी बरोबर १०० वर्षांपुर्ण या परिषदेला झाले व या परिषदेत मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत वर्गाचे नेता म्हणून समोर आले त्यांच्यामुळे चळवळीला दिशाही मिळाली.

या परीषदे मध्ये शाहु महारांज प्रमुख पाहुणे होते. या परिषदे मध्ये शाहू महारांजा प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बहिष्कृत समाजाला म्हटले होते की , ‘तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व देशाचे पुढारी होतील. शाहू महाराजांनी जे भाकीत केले तेच घडल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते झाले आणि त्यांनी अस्पृश्य समुदायाचा उद्धार केला. शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चा जिव्हाळा खूप होता.

आखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि त्यांना या परिषदे मध्ये लोकांनी “राजर्षी “पदवी बहाल केली. महाराजांना शेतकर्‍यांचा राजा म्हणून गौरविले गेले .महाराजांनी शेतकरी व कामगाराच्या प्रगतीचा प्रयत्न केला. शेती सुधारण्याकरीता शेती प्रदर्शन, शेती प्रयोग, कॉफीची लागवड, सहकारी सोसायट्या, स्थापना केल्या. ‘शाहू स्पिनिंग अॅण्ड विव्हिंग मिल्सची ‘स्थापना केली. महाराजांनी “दुष्काळ परिषद ” भरवली होती व शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य केले. भोगावती नदीवर बंधारा बांधला. राधानगरी धरण बाधल. व संस्थानात शेती व आद्योगिक प्रगती साधली. व शाहु महाराज हे सर्व अर्थाने लोककल्याणकारी राजे होते हे त्यांच्या दैदिप्यमान कार्यामुळे सिद्ध होत.

छत्रपती शाहू महाराज हे द्रष्ट समाजसुधारक व कृतीशील प्रगतीशील परिवर्तनशील, पुरोगामी विचाराचे राजे होते व त्यांनी सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून दिला. त्याच्या नावाने हा महाराष्ट्र ओळखला जातो. या महाराष्ट्रातील दिन दुबळ्या वंचित शोषित घटकांला न्याय मिळावा. सध्या जी परिस्थिती आहे यामध्ये सोशल मीडियावरून जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे .चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे थांबाव व शासनाने या मध्ये लक्ष घालाव. अजून ही काही लोक, न्यायच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना न्याय मिळावा हिच “सामाजिक न्याय दिन ” व छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती” दिनी सदिच्छा व्यक्त करतो.

लेखक – ओम पुरी
Ompuri9168@gmail .com

स्वारातीला साडेनऊ कोटी नाही तर आता १७ कोटी रुपये किमतीची ‘३.० टेस्ला एमआरआय मशीन’ मिळणार!

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

articlerajarshi shahu maharajछत्रपती राजर्षी शाहू महाराज
Comments (1)
Add Comment