– जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवा टीम तयार करणार – चाटे
वडवणी, प्रतिनिधी – जय भागवान महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे एक व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये बोलतांना बाळासाहेब सानप म्हणाले की शंकर चाटे हा महासंघ स्थापन केल्यापासून सोबत काम करीत आहे त्याने वडवणी युवक तालुका अध्यक्ष पदाचा कारभार चांगला पार पाडला आहे. त्याची दखल घेत त्यांना बीड जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.
पुढील काळामध्ये त्याच्याकडून समाजाचे व संघटनेचे काम चांगल्याप्रकारे करण्यात यावे असे बाळासाहेब सानप साहेब बोलत होते या बैठकी साठी जिल्हाप्रमुख बप्पासाहेब घुगे,. मराठवाडा अध्यक्ष सचिन डोईफोडे., औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष योगेश खाडे. ,. महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे.,तांदळे सर,. शेख सर. ,करण शिंदे., नितीन मुंडे. ,संतोष राठोड,. अक्षय पंधारे., किशोर चाटे,. सुशांत नेरकर., संदीप टेटाबे,. सुरत लिपारे., विशाल गायकवाड., आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जय भगवान महासंघाची युवा टिम तयार करून जय भगवान महासंघाच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तत्पर राहणार आहोत. बीड जिल्ह्यातील आकराही तालुक्यात जय भगवान महासंघाच्या नवीन शाखा निर्माण करून नवतरुणाईने आपल्या तालुक्यातील सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देऊन त्यांनी जय भगवान महासंघाच्या कार्याची जिल्ह्यात नवी ओळख निर्माण करणार असल्याचे मत जय भगवान महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष शंकर चाटे यांनी व्यक्त केले.
READ MORE – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
READ THIS – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट