वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड व कांतराव देशमुख झरीकर यांचा संकल्प
पालम, प्रसाद पौळ – मराठवाड्यातील एकमेव नैसगिक बेट म्हणून ओळखले जाणारे पालम तालुक्यातील जांभूळबेट नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यावर हे प्रेक्षणीय स्थळ पुरातन मंदीरासह वसलेले आहे. गोदावरी नदीच्या अगदी मधोमध वसलेलं हे छोटंसं बेट, या बेटावर निसर्गाच्या अद्भूत अविष्काराचा अनुभव येतो.
एकेकाळी हे बेट राज्यभरातील पर्यटकांनी गजबजलं असायचं. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे नावाजलेलं पुरातन बेट आज शेवटच्या घटका मोजत आहे . या बेटावर काही काळापूर्वी विविध जातीचे पशुपक्षी, मोरांचे थवे असायचे परंतु अमाप रेती उपसा व प्रशासकीय दुर्लक्ष व सुविधांचा अभाव असल्यामुळे या बेटाची स्थिती बिकट झालेली आहे. नाव जांभूळ बेट असले तरी आता तिथे जांभळाची झाडे अत्यंत कमी आहेत व संपूर्ण बेट बाभळीने व्यापून टाकले आहे. या बेटास पूर्वी सारखेच वैभव प्राप्त व्हावे व एक महत्वपूर्ण पर्यटन केंद्र होण्यासाठी येत्या काही दिवसात,जून महिन्यात येथे १००० जांभळाच्या झाडांची आणि १००० इतर देशी झाडांची श्रमदानाने लागवड करण्यात येणार आहे अशी माहिती कृषीभुषण कांतराव देशमुख झरीकर यांनी दिली आहे.
तसेच या उपक्रमात त्यांना वृक्षमिञ फाऊंडेशन नांदेडचे संतोष मुगटकर जांभळाचे 1000 रोपं देऊन सहभागी होत आहेत. वृक्षप्रेमींनी, पर्यटन प्रेमीं, निसर्ग प्रेमी, वृक्षमित्रांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर यांनी केले आहे. या उपक्रमात आम्हाला सगळ्याच्या सहकार्याची व तेथील स्थानिक लोकांची आवश्यकता आहे असे कांतराव देशमुख व संतोष मुगटकर यांनी बोलतांना म्हटले.
तब्लीग़ी जमात आणि मरकज़ – लियाकत शाह
संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्यास जास्तीत जास्त ५० लोकांना प्रवेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम