जागतिक महिला दिनानिमित्त “नारी शक्ती पुरस्कार” वितरण

खडकवासला, अतुल पवळे – महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

आज पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने,दिघी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस भगिनींना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात स्वत:च्या कुटुंबा प्रमाणे शहरातील नागरिकांची सेवा करणारे माझ्या पोलीस महिला भगिनींचा सन्मान आज जागतिक महिला दिनानिमित्त करणे हे पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे परम कर्तव्य आहे असे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी म्हटले त्या वेळी दिघी पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे साहेब संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे संस्थेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणिस सागर म्हस्के,पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लाड शहराध्यक्ष भाग्यदेव एकनाथ घुले, उपाध्यक्ष दत्ता घुले,युवक कार्याध्यक्ष पराग जोशी, शहर संपर्कप्रमुख कार्तिक गोवर्धन,शहर संघटक प्रसाद माळगावकर,चिंचवड विभाग अधियक्ष वैभव हेंद्रे, चेतन घुले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment