नवी मुंबई – पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महीला उत्कर्ष समिती नवी मुंबई विभागातर्फे 9 ऑक्टोबर या जागतिक स्तन कर्करोग जागरूकता दिवसाचे औचित्य साधत महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या अध्यक्ष माननीय डॉ. स्मिता पाटील यांनी स्तन कर्करोग कारणे, लक्षणे, स्वयं तपासणी व काळजी याविषयी महिलांना माहिती व्हावी याकरिता एक लघुपट सादर करून जनजागृतीच्या कार्यास हातभार लावला.
तसेच महिला उत्कर्ष समिति नवी मुंबईच्या उपाध्यक्ष माननीय गौरी देशपांडे यांच्या सहकार्याने महिला उरण महिला सामाजिक शैक्षणिक संस्कृती संस्था, लायन्स क्लब ऑफ उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने झूम मिटींगचे आयोजन केले होते. झूम मीटिंग च्या माध्यमातून टाटा हॉस्पिटल च्यां स्री कर्करोग विभागाच्या तज्ञ डॉ. ऋचा बंसल यानी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू, उलवे नोड अध्यक्ष वर्षा लोकरे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रुती उरण कर, सचिव दिव्या लोकरे यांचे सहाय्य लाभले.