जागतीक पर्यावरण दिना निमित्त हरिपाठातून होणार विद्यार्थ्यांचे प्रबौधन

कर्नाळा चँरिटेबल ट्रस्टचा आगळा वेगळा संदेश

भोर-वेल्हा तालुक्याला होणार लाभ

भोर, प्रतिनिधी-शुक्रवार दि.५ जून हा सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरणाचे रक्षणात वृक्ष लागवडीचे महत्व असून अनेक विध सेवाभावी आणि पर्यावरणाशी निगडीत संस्था तसेच शासना तर्फे वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवले जातात.

 

या वर्षी जग हे करोनाच्या सावटाखाली असल्याने या वृक्ष लागवडीच्या संकल्पनेवर मर्यादा आल्या असतानाच
पुणे येथील ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या विद्यमाने कवी चंद्रकांत शहासने यांनी वारकरी संप्रदायातील हरिपाठाच्या चालीवर रचलेला निसर्गपाठ ही एक अनोखी भेट नव्या पिढीसमोर यु ट्यूब व्हिडिओ च्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.

 

श्रीपाद कोंडे यांनी या निसर्ग पाठाचे निवेदन केले आहे. वृक्षलागवड करा,झाडे तोडू नका,त्यांचं रक्षण व संवर्धन करा आणि पर्यावरणाचे राखणदार होऊन वेगळ्या पद्धतीने राष्ट्रभक्ती करा,असा संदेश शालेय मुलांना देण्याच्या उद्देशाने ह्या वृक्ष लागवडीच्या हरिपाठाची रचना केलेली आहे.

 

भोर,वेल्हे आणि जून्नर या तीन तालुक्यातील शाळामधील विद्यार्थ्यांना,सामाजिक कार्यकर्ते तसेच अंगणवाडी व आरोग्य कर्मचार्यांच्या माध्यमातून हा उपक्रम पालक व विध्यर्थी वर्गापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन श्रीपाद कोंडे यांनी केले आहे.
ह.भ.प.गायत्री कोंडेदेशमुख, किर्तनकार मंदार गोखले,सुषमा गोखले आणि सामाजिक कार्यकर्ते व कवी श्रीपाद कोंडे यांनी हा हरिपाठ वृक्ष लागववड आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्धेशाने सादर केला आहे.

 

या संदर्भात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करोना च्या काळात एक आगळावेगळा उपक्रम शालेय मुलांच्या पर्यावरण विषयक प्रबोधणासाठी तयार करण्यात आला असून त्याचा लाभ घेतल्यास पर्यावरणाचे रक्षणात मोठात फायदा होईल असा विश्वास या उपक्रमाचे मार्गदर्शक वनविभागाचे अधिकारी रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.

मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार

script async src=https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js/script

ins class=adsbygoogle

style=display:block

data-ad-format=autorelaxed

data-ad-client=ca-pub-1232538928057048

data-ad-slot=9070704187/ins

script

(adsbygoogle = window.adsbygoogle && ).push();

/script

Comments (0)
Add Comment