जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे शालेय पाठयपुस्तकांचे वाटप

किनवट, प्रतिनिधी – बुधवारी ( दि. १७ ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे शालेय पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली.

या पुस्तक वितरणाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी हे मुखपट्टी लावून उपस्थित होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आगोदर सॅनिटायझर देऊन नंतर त्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी शारीरिकक दुरीचे निकषही पाळण्यात आले. यावेळी मोहपूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश होळकर,शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चौधरी, सह शिक्षक शशिकांत कांबळे, ग्रामसेवक पिराजी झटकवडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चाहेल, मारोती रणमले, दीपक कराळे, साहेबराव शेळके, सुधाकर मुकडे, गजानन डाखोरे, खंडू पिठलेवाड, अंबरसिंग चाहेल, सुरेश पवार, विश्वनाथ मेश्राम, भगवान कांबळे, रमेश जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय ; ‘अशा रीतीने होणार गुण निश्चिती’

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन

नोकरी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा



Comments (0)
Add Comment