डॉक्टर डे, कृषि दिनानिमत्त आमदार डॉ वसंतराव बोंडे यांचा गुणगौरव

हिंगणघाट,दि 01(प्रतिनिधी)ः
डॉक्टर डे ,कृषिदिवस व वाढदिवसाच्या निमित्य ग्राम गौरव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ वसंतराव बोंडे यांचा गुणगौरव गुरुवारी (दि.01) करण्यात आला.

सरस्वती विद्यालय शेगांव(कुंड)व सरस्वती विद्यालय पाईकमारी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यात विक्रमी चना उत्पादन केल्याबद्दल सरस्वती विद्यालय चे मुख्याध्यापक धनराज कोल्हे यांनी वृक्ष व सरस्वती विद्यालय पाईकमारी चे मुख्याध्यापक श्री जीवराज भोयर यांनी वृक्ष भेट देऊन वाढ दिवसाच्या व कॄषि क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.संध्याताई बोंडे यांना डॉक्टर डे निमित्य वृक्ष देऊन गौरविण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ.वसंत बोंडे ,डॉ.संध्या बोंडे,डॉ. दिपाली बोंडे ,डॉ. तन्मय बोडे संस्थेचे सचिव गौरव बोंडे यांचा सरस्वती विद्यालय शेगांव(कुंड) व पाईकमारी यांच्याकड़ूंन गुणगौरव व सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक राजेश झाडे संचालन अरविंद कोपरे व आभार चंद्रशेखर निमट यांनी मानले

Comments (0)
Add Comment