दि. इंडिया सिमेंट लिमिटेड च्या वतीने परळी उपजिल्हा रुग्णालयास पी.पी.ई किटच वितरण

परळी, प्रतिनिधी –  कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर परळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,नर्स अदी कर्मचारी ख-या अर्थाने योगदान देत आहेत.आरोग्य प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांचे आरोग्य सुदृढ रहावे आपले कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणुन येथील दि. इंडिया सिमेंट लिमिटेडच्या वतीने जनरल मॕनेजर शशी भूषण मुखिजा यांच्या मार्गदर्शनाखाली मानव संसाधन अधिकारी गोपाल काष्टे, डॉ. सूर्यकांत मुंडे, ए.पी.आय.नारायण गित्ते, डी.एस.बी.रुपेश शिंदे, दीप जाधव, अँड्र्यू थॉमस यांच्या उपस्थितीत पी. पी. इ. किक्ट्स रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात आल्या.

यावेळी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनेश कुरमे, रामधन कराड, नागनाथ मामीलवाड,प्रशांत कराड ,हरिभाऊ सर्जे,श्रीमती उर्मिला सरवदे, शेख सादेक सूर्यकांत कुंभार, बनसोडे व इतर उपस्थित होते. दि. इंडिया सिमेंट लिमिटेड नेहमी सामाजिक कार्यात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेत आहे.या कोरोनाच्या महामारीत ही कंपनीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीतून हा मदतीचा हात दिला आहे.या कार्याचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.

अबब… वनामकृविचे सोयाबीन बियाणे नापास, शेतकर्‍यांची फसवणूक

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedparli
Comments (0)
Add Comment