नायगाव ,दि 27 (प्रतिनिधी)ः
सामाजिक कार्यकर्ते अंकुश कुमार देगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगाव येथील पूज्य साने गुरुजी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थाचे संचालक रावसाहेब पाटील मोरे व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा सरचिटणीस तुकाराम पाटील मोरे व मराठा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील होटाळकर व आझाद पार्टीचे कार्यकर्ते कपिल भाऊ डुमणे, ग्रामपंचायत सदस्य इमाम शेख, विठ्ठल बेळगे, बंटी पाटील, शिंदे, पत्रकार रामकृष्ण मोरे, मुख्याध्यापक विभुते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे नागठाणे, देवाले आदी उपस्थित होते.