देवशयनी(देवांच्या निद्रेची) आषाढी एकादशी

मनमाड , प्रतिनिधी  – मनमाड येथील सुमारे 150 वर्षे प्राचीन व जागृत असे बालाजी विठ्ठल-रुख्मिणी(नाईकांचे) मंदिर असून नित्यनियमाने दरवर्षीप्रमाणे आषाढ एकादशी ला भव्यदिव्य अश्या भरगच्च कार्यक्रमांनी विठ्ठल-रुख्मिणी शोभायात्रा काढून भक्ती मय वातावरणात मनमाड शहरात मोठ्या आनंदाने कार्यक्रम उत्साहाने होत होते मात्र कोविड 19 कोरोना विषाणू चा जगभर असलेला प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी अजुनही धार्मिक स्थळे खुली झालेली नसल्याने विठ्ठल-रुख्मिणी मंदिर विश्वस्त यांनी कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व संसर्ग संबंधी असलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन मनोभावे विधीपूर्वक पुजा करून आषाढी साजरी करण्यात आली व संपुर्ण जगातून लवकरच ह्या विषाणूचा रोगाचा नाश होवो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना उत्तम आरोग्य रुपी प्रसाद मिळावा अशी आशा व्यक्त केली गेली.

प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?

‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अ‍ॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

manmadnashik
Comments (0)
Add Comment