धनज पोलीस स्टेशन अंतर्गत मेहा येथे लॉक डाऊन मध्ये अवैध दारू विक्री सुरु

वाशिम, विनोद नंदागवळी-कारंजा तालुक्यामध्ये ग्राम मेहा येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू असून त्यामध्ये सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, तसेच कोरोना महामारी विषाणूमुळे देशात लॉकडाऊन ची परिस्थिती कायम असल्याने मजूर वर्गाला दोन वेळची भोजनाची व्यवस्था करायला मजुरी करावी लागते त्यामध्ये ही लॉकडाऊन मूळे मजुराला कामे मिळत नाही आहे, त्यामध्ये हा अवैध दारू विक्री प्रकार मजुरांना आणखी डबघाईस आणतो, अवैध चिल्लर दारू विक्रेत्यामूळे समाजाला सामाजिक व मानसिक त्रास होतो आणि दारू पिणाऱ्यामुळे कलम १४४ व लॉकडाऊन चे उल्लंघन होताना दिसत आहे, असे जनतेचे मत आहे, त्या करिता मेहा ग्राम येथील समता सैनिक दल , महिला मंडळ व महिला बचत गट यांनी लॉकडाऊन चे पालन करून ठाणेदार साहेब पोलिस स्टेशन धनज यांना निवेदन दिले आहे.

 

होम क्वारंटाईम केलेल्या नागरिकावर गाव समितीचे दुर्लक्ष

अवैध दारूलॉक डाऊन
Comments (0)
Add Comment