ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने ‘कोविड हेल्थ’ सेंटरला ‘गिझर भेट

कापूरहोळ, प्रतिनिधी – भोर येथील ध्रुव प्रतिष्ठान ही स्वयंसेवी सामाजिक संस्था गेली सात महिने वेगवेगळ्या प्रकारे कोरोना प्रतिबंध व उपाययोजना या द्वारे स्वखर्चाने विविध कामे प्रभावी पणे दानशूर पद्धतीने काम करत आहे.

भोर येथील उपजिल्हा कोविड हेल्थ सेंटर वर गरम पाण्याची व्यवस्था नाही व रुग्णांकडून गरम पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे असे भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्याकडून राजीव केळकर यांना समजताच त्वरित ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने 100 लोकांची सोय होईल असे 15 लिटर व 10 लिटर चे दोन गिझर तहसीलदार अजित पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रसंगी तहसीलदार अजित पाटील सेंटर वर काम करणारे डॉ. आनंद कंक, मिसेस डॉ. डोरे, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेटे, भोर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष सारंग शेटे, दै. पुढारीचे पत्रकार चंद्रकांत जाधव व सेंटर वरील कर्मचारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment