नवा वाद-राज्यपालांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली

मुंबई,दि 11 ः
महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं विमानात बसलेल्या राज्यपालांना विमानातून पुन्हा उतरावे लागले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून वाद पाहिले आहे. पण, आज मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करू दिले गेले नाही.  राज्यपाल आज सकाळी 10 वाजता  मसुरी येथे नवनियुक्त आयएएस अधिकारी 122 बॅच कार्यक्रम यासाठी जाणार होते.
मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहराडून येथे जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपाल यांनी चार्टर विमानाऐवजी रेग्युलर फ्लाईटने देहरादून येथे गेले. राज्य शासनाने चार्टर फ्लाईट पूर्व नियोजित उपलब्ध करून द्यावे, असे राजभवनाकडून सांगण्यात आले होते. ते उपलब्ध का करून दिले गेले नाही याची माहिती तुर्तास उपलब्ध झालेली नाही.

Comments (1)
Add Comment