नांदगाव येथील शेतकरी समीर भुडेची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – तालुक्यातील नांदगाव(कानगाव) येथील शेतकरी समिर गणपतराव भुडे (३४) याने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतक समीर यास सात वर्षे वयाचा मूलगा असून पत्नी तसेच आईवडील व दोन भाऊ असा त्याचा परिवार आहे. नांदगांव येथे त्याचे परिवाराकडे 4 एकर शेती आहे.

नांदगांव येथील हेमंत घोड़े याचे आत्म्यहत्येनंतर लगेच तीसऱ्या दिवशी आज दि.१८ रोजी पहाटे समिर याने आपल्या राहते घरिच मृत्युला कवटाळले,तीन दिवसापूर्वी झालेल्या आत्महत्येनंतर लगेच पुन्हा एका शेतकरी युवकाने आत्म्यहत्या केल्याने शोककळा पसरली आहे. या तीन दिवसात तालुक्यातील एकाच गावात दोन आत्म्यहत्या झाल्याने प्रशासनसुद्धा खड़बडुन जागे झाले.सदर प्रकरणी अल्लीपुर पोलिस तपास करीत आहे.

घरात नाही खायला भाकर अन् मुलांना म्हणतात स्मार्टफोन वापर?
बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019: पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन



Comments (0)
Add Comment