नांदगाव – नगरपरिषद नांदगाव च्या वतीने आज पर्यंत नागरिकांनी नांदगाव शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी जे अनमोल असे सहकार्य केले त्याबद्दल नांदगाव वासियांचे मुख्याधिकारी श्रीमती श्रीया स्वप्नील देवचके यांनी नांदगाव वाशियांचे आज शतशः आभार मानले.
आज पर्यंत नांदगाव शहरात एकूण अकरा कोरोना व्हायरस रुग्ण होते. त्या पैकी दुर्दैवाने तीन रुग्णांचा मृत्यू झाले असून दिनांक 16- 6- 2020 रोजी उर्वरित सर्व रुग्ण हे कोरणा मुक्त झाले आहेत. नांदगाव शहरात सध्या एकही नवीन कोरणा रुग्ण सापडला नसून सध्या स्थितीत नांदगाव शहर हे कोरणा मुक्त झाले आहे या वेळी मुख्याधिकारी श्रीमती श्रीया देवचके यांनी
सर्व नांदगाव वासियांना आवाहन केले.
विनाकारण कोणी हे घराबाहेर पडु नये नियमित मास्क चा वापर करावा बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर करावा सर्दी,खोकला आणि ताप यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा .55 वर्षापेक्षा जास्त व 10 वर्षाखालील नागरिकानी विनाकारण घराबाहेर निघू नये. बाजारत विनाकारण गर्दी करु नये
असे जाहीर आव्हान केले.
आज रोजी नांदगाव चे 2 व्यक्ती व ग्रामीण भागातील 3 व्यक्ति असे 5 व्यक्ती डिस्चार्ज करण्यात आले.असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी दिली.
नांदेडमध्ये एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण २८६ झाले
matrimonial वेबसाईटवर जोडीदार शोधताय ? मग हे नक्की करा