नांदेड – जिल्ह्यात कोरोना या महाभयानक आजाराचा आलेख वरचेवर वाढतच चालला आहे, रोज अनेक लोक या आजारास बळी पडत आहेत , तरीसुद्धा नागरिकांना याचे गांभीर्य लक्षात आले नसून, नागरिक नियमावलीना केराची टोपली दाखवून शहरात सैराट वावरताना दिसून येत आहेत.
आज प्राप्त एकूण २२६ अहवालांपैकी १९८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून १० रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २९६ इतकी झाली आहे. आज प्राप्त अहवालामध्ये ५ महिलांचा तर ५ पुरुषांचा समावेश आहे, सदर रुग्ण हे शहरातील सोमेश कॉलनी, चैतन्यनगर, परिमलनगर, भगतसिंग रोड, गजानन कॉलनी तरोडा येथील आहेत तर इतर रुग्ण हे कामठा बु., विठ्ठल मंदिर मुखेड, कळमनुरी हिंगोली आणि औरंगाबाद येथील आहेत.
आजतागायत २९६ रुग्णांपैकी १८१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व १३ रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १०२ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील ३ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. तर ५ रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.
अफवेवर विश्वास न ठेवता नागरिकांनी घाबरून न जाता वेळोवेळी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे.
घरात नाही खायला भाकर अन् मुलांना म्हणतात स्मार्टफोन वापर?
बेरोजगारांना सुवर्ण संधी : ‘या’ वेबसाईटवर एक क्लीकवर मिळणार नोकरी
राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन