नायगावात कोरोना बाधितांच्या संख्येत 8 ने वाढ

नायगाव, प्रतिनिधी – नायगाव तालुक्यात वं शहरात कोरोना संसर्ग ची मालिका चालुच असून मंगळवारी सायंकाळी आलेल्या शासकीय प्रेस नोट च्या सूत्राकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे कोरोना बाधीत रुग्ण संख्येत 8 ने वाढ झाली आहे.कहाला ता नायगाव येथील 50 वर्षीय पुरुषांचा नांदेड शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना नांदेड येथे मृत्यू झाला आहे नायगाव कोव्हिडं केअर सेंटर येथून एकही रुग्णास सुट्टी देण्यात आली नसून 27 रुग्णावर उपचार चालू आहेत.

नायगाव शहर व तालुक्याच्या कोरोनाबाधित,रुग्णाचे नातेवाईक व सहवासीतानचे कोव्हिडं केअर सेंटर नायगाव येथुन पाठवलेल्या स्वाबमध्ये 3 पोजिटिव्ह आले तर अँटीजन टेस्ट पैकी 5 जण पोजिटिव्ह आलेआहेत
नायगाव कोव्हिडं सेंटर येथुन एकाही रुग्णाला मंगळवारी सुटी देण्यात आली नसून सध्या 27 कोरोना बधितांवर येथे उपचार चालू आहेत. नायगाव केअर सेंटर येथून मंगळवारी 25 स्वाब पाठवण्यात आले आहेत त्याचे अहवाल प्रलंबीतअसून बुधवारी अहवाल प्राप्त होतील.

नायगाव तालुक्यातिल कोरोना ने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या घरात व नातेवाईका च्या घरी पोळ्याच्या सणावर संकटाचे सावट दिसून आले घरचे कर्ते पुरुष व अन्य मंडळी कोरोना या संसर्गजन्य आजाराशी सामना करीत असल्याने त्यांच्या नातेवाईक व घरच्यांना पोळ्या चा सण रुख रुख वाटत होता.सर्जा राज्या च्या बैलाला मायेने हाथ फिरवणारा मालक आजारी असल्याने तो ही सणाच्या दिवशी रुसून आपली हक्काची नवैद्याची पोळी न खाता रुसल्याने बैला वर कोरोनाच्या संकटाचा प्रादुर्भाव दिसून आला.

Comments (0)
Add Comment