ना गावकरी ना वारकरी भाविक यांच्या अनुपस्थितीत निमंत्रित ५० जनांच्या उपस्थित माऊलींचे प्रस्थान

आळंदी देवाची : संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यापेक्षा सर्वात जास्त उत्साह,भक्तीमय जल्लोष, आळंदीकर ग्रामस्थांचे उत्साही वातावरण,वारकरी संप्रदायाच्या दिंड्याची नयनरम्य अल्लोट गर्दीत होणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदाच्या वर्षी मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन ना गावकरी ना वारकरी भाविक यांच्या अनुपस्थितीत निमंत्रित ५० पासधारकांच्या उपस्थित अतिशय शांतता आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी एका महिला कोरोणा मुळे मृत झाल्याने सदर मंदीर परिसर बफर झोन घोषित करण्यात आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,आळंदी नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात सॅनीटाईज केले होते,संस्थान कमिटीने निमंत्रित पासधारक यांची थर्मल स्कॅन,सॅनीटायजर करुन सर्वांनी मास्क लावून मंदिरात प्रवेश दिला गेला.

पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते पवमान पुजा करण्यात आली, सकाळी दहा ते बारा यावेळी हभप अवधूत महाराज चोपदार यांचे काल्याचे किर्तन झाले.मंदीरात अतिशय सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती.

दुपारी एक च्या सुमारास मोजक्या बृम्हवृंदांच्या उपस्थित संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी वर अतिशय सुंदर डोळ्याचे पारणे फिटले अशी मुर्ती पुजा आणि सजावट केली गेली, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक आणि शितोळे सरकार यांच गाभाऱ्यात आगमन झाल्यानंतर आरती होऊन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील आणि पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या चल पादुका पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफाळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्या.

पालखी सोहळा मालक यांनी चल पादुका घेऊन विना मंडपात आकर्षक फुलांनी सजवलेल्या चौरंगावर ठेवल्या माऊलीच्या चल पादूका विराजमान झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मार्फत संस्थानचे सर्व मानकरी यांना पागोटे आणि नारळ वाटप करण्यात आले नंतर पालखी सोहळा मालक यांच्या हस्ते उपस्थित विश्वस्त मंडळ, मानकरी, दिंडीप्रमुख यांना नारळ वाटप करण्यात आले, माऊलींची आरती सुरु झाली त्यानंतर माऊलींची पालखी समस्त आळंदीकर युवक माऊली माऊली चा जयघोष करत खांद्यावर घेत असतात परंतू यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर पालखीमध्ये चल पादुका न ठेवता पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफाळकर यांनी हातात घेऊन मंदिरात ज्ञानोबा माऊलीच्या हरीनामाच्या गजरात प्रदक्षिणा घालून पश्चिम दरवाजातून आजोळघरी दर्शन मंडपात गांधी परिवाराच्या वतीने आरती होऊन दशमी पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या माऊलींच्या चल पादुका तेथेच वास्तव्यास असेल आणि दशमीला विमान किवा वाहनातून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल तो पर्यंत आजोळ घरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समोर नित्योपचार,किर्तन,जागर मोजक्याच लोकांमध्ये होणार आहे.

यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा न्यायाधीश एन.पी. धोटे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक,पालखी सोहळा मालक बाळासाहेब अरफाळकर, राजाभाऊ अरफाळकर,शांतीब्रम्ह हभप मारूती महाराज कुर्हेकर बाबा, प्रांताधिकारी संजय तेली, तहसिलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भुमकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, श्रींचे चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, माजी नगराध्यक्ष आणि मानकरी राहुल चितालकर,मानकरी योगिराज कुऱ्हाडे,अनिल कुऱ्हाडे, योगेश आरू,माजी नगरसेवक डि.डि.भोसले पा.,आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आदि मान्यवर उपस्थित होते, मंदीर परिसरात अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नाभिक समाजाची महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे मदतीची विनंती

वृंदावण कॉलणीत नळजोडणी कॅम्पला प्रतिसाद

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

alandi devachipune
Comments (0)
Add Comment