नियंत्रणात आणून दाखवलं; WHO कडूनही करोनासंदर्भातील धारावी मॉडेलचं कौतुक.

मुंबई – देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाशी सामना करण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही सुरू आहेत. दरम्यान, मुंबईतील धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनंही दखल घेतली असून त्यांच्याकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आली आहे.

धारावीतील झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. तब्बल २.५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या भागात जवळपास ६.५ लाख लोकं वास्तव्य करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील या ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे. “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो,” असं टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हणाले. “जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते.

इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘आयुष काढा’

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

coronawho
Comments (0)
Add Comment