पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर म्हणजे सरकारी कार्यालय नव्हे’, हे अधिकार्‍यांनी लक्षात ठेवावे !

श्रीविठ्ठलाची प्रक्षाळ पूजा चालू असतांना अधिकार्‍यांनाही स्नान घालणे निषेधार्ह; परंपरा मोडणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

सोलापूर,प्रतिनिधी –  महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीविठ्ठलाच्या मूर्तीवर 9 जुलै या दिवशी प्रक्षाळ पूजेचा धार्मिक विधी चालू होता. तेव्हा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीच्या एका अधिकार्‍यास गाभार्‍यातच स्नान घातल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. त्याही पुढे जाऊन स्नान घातलेल्या अधिकार्‍यांनी ‘आमचीच प्रक्षाळ पूजा केली की ?’ असा प्रश्‍न केल्यावर उपस्थित पुजार्‍यांनीही ‘हे असेच असते’ असे उत्तर दिल्याचे व्हिडिओतून दिसले.

हे अत्यंत निषेधार्ह असून या प्रकाराविषयी विठ्ठलभक्त, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सरकारीकरण झाले असले, तरी सरकारी अधिकार्‍यांनी ‘मंदिरे ही सरकारी कार्यालये नाहीत’, याची जाणीव ठेवावी.

मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर प्रशासनाकडून सातत्याने असे गैरप्रकार होत आहेत. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍यातच सेक्युलर प्रशासनाच्या अधिकार्‍याला देवासोबत स्नान घालून त्यांना देव बनवण्याचे काम पुजार्‍यांनी करू नये. कोरोनाकाळातील जमावबंदीच्या नियमाकडे बोट दाखवून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरून आलेल्या पालखीला पंढरपूरच्या मंदिरात न सोडणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांनी मंदिरातील धार्मिक नियमांचे पालन का करू नये ? त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे, असेही समितीने कळवले आहे.

घरी हवन केले म्हणून गुन्हा; मात्र रमजानच्या काळातील गर्दीवर कारवाई नाही, हा हिंदुद्वेषच !

मे महिन्यात तुळजापूर येथील नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री अंबुगले नावाच्या व्यक्तीने कोरोना महामारी निवारणार्थ समाजहितासाठी रहात्या घरी ‘मन्युसुक्त’ होम केला होता. त्याविरुद्ध एक ऑनलाईन तक्रार आल्याने दोन महिन्यांनी पोलिसांनी अंबुगले यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे अतिशय संतापजनक आहे.

घरी 4 जणांनी होम केल्याने गुन्हा दाखल झाला; मात्र सार्वजनिकरित्या शासन नियम मोडून रमजानच्या काळात खरेदीसाठी गर्दी करणार्‍यांवर आणि दारूच्या दुकानांबाहेर गर्दी करणार्‍यांवर किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ? याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यायला द्यावे.

‘अन्य धर्मियांना वेगळा न्याय आणि हिंदूंना वेगळा न्याय’, हा हिंदुद्वेषच होय ! समिती या एकतर्फी कारवाईचा निषेध करते. तसेच अंबुगले यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केली आहे.

अपडाऊन करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांपासुन कोरोना पसरण्याची शक्यता

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

pandharpursolapur
Comments (1)
Add Comment