परभणी मनपाची सर्वसाधारणसभा ऑनलाईन

परभणी ,प्रतिनिधी : शहर महानगर पालीकेतील आॅनलाईन सर्वसाधारण सभा दि.१७ जून २०२० रोजी दु. १२ वा. महापौरच्या दालनात घेण्यात आली. यावेळी सर्वसाधाऱण सभेचे अध्यक्षस्थानी सौ.अनिताताई रविंद्र सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे आयुक्त देविदास पवार, मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त गणपत जाधव नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

आॅनलाईन सर्वसाधारण सभा मनपाच्या इतिहासात पहिल्यांचा घेण्यात आली. या बैठकीत सहा.नगरचनाकार किरण फुटाने , शहर अबियंता वसीम पठाण, पाणी पुरवठा अभियांता तनविर मिर्झा बैग, पवन देशमुख , प़्रसिध्दी विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांच्या उपस्थितीत १७ विषायवर चर्चा कऱण्यात आली.

१६ विषयांना मंजुरी देण्यात आली एका विषयावर चर्चा करून आयुक्तांनी अहवाल सादर केल्यांनतर मंजुरी देण्यात येईल. शहरातील मोबाईल टॉवर नियमीत कऱणे बाबत या विषयावर सभागृहात सहा.नगररचनाकार किरण फप्ुटाने यांनी शहरात १०९ टॉवरची नोंद आहे.

त्यापैकी १०६ टॉवर चालू आहेत. विनापरवानगी आहेत त्यांना परवानगी दिल्यानंतर नियमीत करण्याकरीता हा विषय ठेवण्यात आला आहे. विकासशुल्क ,कर लावून नियमीत करण्यास प्रस्ताव आहे.त्यामुळे मनपाच्या उत्पनात वाढ होणार आहे.

या विषयावर सभागृह नेते सयय्द समी उर्फमाजुलाला, अतुल सरोदे यांनी या विषयावर सुनिल देशमुख यांनी टॉवर हा विषय उच्च न्यायालयात केस चालू आहे. संपुर्ण माहीती घेवून प्रस्ताव घ्यावा. या विषयावर उपमहापौर आयुक्तांनी सविस्तर अहवाल सादर करावा असे सुचविले नंतर सभागृहात सी.ए.ए. एन.आर.सी. कायदा व एन.पी.आर. विरोधत ठराव सभागृहात एकमताने मंजुरी दिली. या ठरावावर भाजपच्या आठ नगरसेवकांनी विरोध केला आहे.

सभागृहात या विषयावर सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, सभापती गुलमीर खान ,शेख फहाद,शेख हमीद आदींनी विषय मांडला होता त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. महापौर सौ.अनिता रविंद्र सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी मंजुरी दिली.

शहरातील अंतर्गत मुख्य रस्त ेव आदी ठिकाणी साईन बोर्ड लावणे त्यावर सभागृहात एकमताने मंजुरी दिली. मनपाच्या विविध विकासकामासाठी मंजुरी देण्यात आली. सुधारीत विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २५ ़अन्वये जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी एकमताने मंजुरी देण्यात आली.

परभणी शहरातील रस्ता दुभाजकाचे सुशोभीकऱण करण्यासाठी विषयावर जिंतूर रोड, शाही मस्जिद रोड, शासकीय रुग्णालय रोड, रस्ता दुभाजक सुशोभीकऱण करण्यासाठी एजन्सीला कुठलाही मोबदला मनपा देणार नाही. यासाठी झाडाची देखभाल करत असल्याबाबत पथदिव्यावर फलक लावता येतील मनपात आर्थिक उतप्नन वाढेल.

या सर्व विषयावर चर्चा कऱण्यासाठी आॅनलाईन सर्व नगरसेवक , सभागृहनेते सय्यद समी, सभापती गुलमीर खान, विरोधीपक्षनेते विजय जामकर, नगरसेवक सुनिल देशमुख ,अतुल सरोदे,इमरान हुसैनी, विकास लंगाटे, बाळासाहेब बुलबुले, सचिन देशमुख, सौ.वर्षा खिललारे,मा.महाुपौर मिनाताई वरपूडकर,पठाण नाजनीन ,श्रीमती जयश्री खोबे,कमलाताई काकडे,लियाकत अन्सारी आदी मनपा सदस्य उपस्थित होते.

माजलगांव तालुक्यात खरिपाच्या ५० टक्के पेरण्या पूर्ण

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

parbhani
Comments (0)
Add Comment