परळी : परळी शहरामध्ये यावर्षी नव्यानेच सुरु झालेल्या परळी नागरी सहकारी पातसंस्थेने अल्पावधीतच तालुक्याच्या आर्थिक तथा सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक केला असुन पतसंस्था प्रगती पथावर असून 31 मार्च 2020 अखेर पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 2 कोटी 23 लाख पेक्षा जास्त असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष तथा संचालक मंडळाने दिली आहे.
याबाबतीत अधिक वृत्तांत असा की परळीच्या आर्थिक तथा सहकार पटला वरती परळी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रूपाने एक नविन नाव उदयास येत असुन या संस्थेने अल्पावधीतच ग्राहक सभासद तथा ठेवीदारांचा विश्वास संपादन करत आपली दमदार वाटचाल सुरू केली आहे. अल्पावधीत ग्राहक, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केल्याने या पतसंस्थेने या आर्थिक वर्षा अंती मार्च अखेरीस 3 लाख 45 हजार नफा मिळवला आहे.तर पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 2 कोटी23 लाख रुपायांपेक्षाही जास्त असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.भालचंद्र तांदळे, उपाध्यक्ष डॉ.विश्वास भायेकर, सचिव श्री. गोपाळ कंकाळ, कोषाध्यक्ष श्री.प्रभाकर हजारे तसेच सर्व संचालक आणि व्यवस्थापक श्री.विशाल देशमुख आदींनी दिली आहे. ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांनी पतसंस्थेवर टाकलेल्या विश्वासाबद्दल अध्यक्ष संचालक मंडळ तथा सर्व कर्मचारी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.