जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू –मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार
बीड – परळी शहरात कोरोना विषाणू समुह संसर्गाचा धोका वाढल्यामुळे आरोग्य विभागाने घरोघर सर्वेक्षणाचा निर्णय घेतला असून २५ हजार ५९७ घरातील १ लाख ३३ हजार ९४३ लोकांचे सर्वेक्षणदेखील सुुरु करण्यात आले आहे याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
परळी शहरात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शहरी भागात आरोग्य सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी आरोग्य अधिकारी कर्मचार्यांसह अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, बहुउद्देशीय कर्मचार्यांची पथके तयार करण्यात आली घरोघरी जावून नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
विविध आरोग्य उपकेंद्राअंतर्गतच्या विविध नागरी वसाहतीतील लोकांच्या आरोग्या संदर्भात माहिती जाणुन घेऊन नोंद इजी अॅपमध्ये घेतली जात आहे.
सर्वेक्षण होणाऱ्या संबंधित घरातील व्यक्तींच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करण्यात येईल. तसेच घरातील व्यक्तींमध्ये बीपी, शुगर, क्षयरोग, कॅन्सर असे आजार असतील तर यांची माहिती तात्काळ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येईल. तसेच मागील आठ दिवसात सारी, ईएलआयची ( sari/ ili) लक्षणे आढळुन आल्यास त्याचबरोबरच ज्या व्यक्तींना सदी,खोकला असतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लाने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतील.
यासह कोरोना प्रादुर्भाव असलेल्या औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, नागपूर इत्यादी भागातून आलेले व ज्यांचा बीडमधील वास्तव्य कालावधी 5 ते 14 दिवसांचा आहे अशा नागरिकांशी नोंद घेतली जात आहे. या बरोबरच अन्य माहितीही नोंदवली जात आहे.
औषधी दुकानांना भेट देवून सदर दुकानातुन मागील ८ दिवसात( ILl/SARI )सर्दी ताप खोकला इ. लक्षणे असणाऱ्या रुग्णांना औषधी दिले असल्यास सदर रुग्णांची सपुर्ण माहीती घेऊन तात्काळ कळवावे तसेच त्यांना इजी अॅप मध्ये नियमित अहवाल सादर करण्यत येत आहे
बाहेर जिल्ह्यातून /गावावरुन आलेल्या व्यक्तींच्या घरावर स्टीकर लावुन त्यांना होम कॉरंटाईन करण्यात यावे
व ते हॉम कॉरंटाईन आहेत यांची शाहनिशा दररोज करण्यात येणार आहे
तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सहमतीने ज्या रुग्णांचे स्वब तपासणी करावयाचे आहे अशा सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे संदर्भीात केले जाणार असून त्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे.
परळीची धाकधुक वाढली! काल पाठवलेल्या 50 पैकी 1 पॉझीटीव्ह
सेलूतील एसबीआय बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह