जय प्रॉव्हिजन चे राजकुमार सोनी व पत्रकार प्रकाश वर्मा यांचा उपक्रम
परळी, प्रतिनिधी – परळी शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने गेल्या 12 तारखेपासून परत शहरात संचारबंदी लॉकडाऊन करण्यात आले या संचार बंदी मध्ये सेवा कार्य करत असलेल्या पोलीस कर्मचारी अधिकारी व होमगार्ड यांना सर्वांना जागो जगी स्पॉट ड्युटी लावल्याने सकाळ पासून परळी करांच्या आरोग्य साठी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये या साठी पोलीस प्रशासन आपले कार्य करत आहे. या लॉकडाऊन मध्ये जय प्रॉव्हिजन चे राजकुमार सोनी व पत्रकार प्रकाश वर्मा यांनी रोज सकाळी वेग वेगळ्या अल्प आहार बनवून पोलीस प्रशासन व होमगार्ड यांना सकाळी नाष्टा,निहारी ची सुविधा देत आहेत.
अधिक माहिती अशी की गेल्या आठ दिवसापासून शहरात संचारबंदी आदेश लागू झाल्याने बाहेर गावाहून आलेले पथक व होमगार्ड यांना सकाळी नाष्टा ची सुविधा करत खिचडी,उपमा,पुरीभाजी,झुणका भाकर,पोहे असे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आहार बनवून परळी कारणांसाठी दिवसभर कार्य कर्तव्य दक्ष कार्य करत असलेल्या होमगार्ड पोलीस प्रशासनास घडेल तसे सेवा देत आहे.