परवानगी गावात ; सेवाकेंद्र थाटले जाते बँक परिसरात ग्रामस्थांना सुविधा मिळेना

माजलगांव,प्रतिनिधी :- बँकेत असणारी ग्राहकांची गर्दी कमी व्हावी , ग्राहकांना तत्पर सुविधा गावातच मिळावी याकरिता अनेक बँकांनी बीसी ( ग्राहक सुविधा केंद्र ) दिले आहेत . हे केंद्र त्या गावाऐवजी बँक परिसरातच थाटले गेल्याने ग्राहकांना गावात सुविधाच मिळत नाहीत . यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .

तालुक्यातील टाकरवण याठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेअंतर्गत पंधरा गावांचा समावेश आहे . या खेड्यातील ग्राहकांना तत्पर सुविधा मिळावी याकरिता ग्राहक सुविधा केंद्र नियुक्त करण्यात आले आहेत . यामुळे गावातील ग्राहकांना गावातच व्यवहार करता येऊ लागले होते . यामुळे टाकरवणला जाण्याचा खर्च आणि वेळही वाचत होता .

परंतुआता हे नियुक्त केलेले ग्राहक सेवा केंद्र बँक परिसरातच थाटले गेल्याने ग्राहकांना गावातून टाकरवण येथे यावे लागत आहे . तसेच अनेक लोक आता ग्राहक सेवा केंद्र टाळून थेट बँकेत येत असल्याने गर्दीही वाढली आहे . बँकेतील सुविधा इतर ठिकाणी उपलब्ध करून दिल्यानंतरही बँकेतील गर्दी कायम असल्याने अधिकाऱ्यांनाही अडचणी येत आहेत .

सध्या कोरोना संसर्गाचा धोका असतांनाच्या काळात बँक अधिकाऱ्यांनी शाखेत होणारीगर्दी कमी करण्यासाठी संबंधित ग्राहक सेवा केंद्र नियुक्त केलेल्या ठिकाणीच ग्राहकांना सेवा देण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी केली जात आहे .

सध्या सर्वच बीसी बँक परिसरात दुकाने थाटून बसले आहेत . ग्रामीण भागातून ग्राहकांना याच ठिकाणी व्यवहाराला यावे लागत असेल तर बीसीचा उपयोग काय , असा प्रश्न विचारला जात आहे . यावर कारवाईची मागणीही केली जात आहे .

बँकेने ज्या ठिकाणी बीसी ( ग्राहक सेवा केंद्र ) दिले आहे , त्याच ठिकाणी सेवा देणे अपेक्षित आहे . यामुळे ग्राहकांना त्यांच्या परिसरातच सुविधा मिळू शकेल .
-भागवत पोटे , शाखा व्यवस्थापक , टाकरवण

शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्ज वाटप तात्काळ करा

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (0)
Add Comment