पांदन रस्ताचा पूल फोडला,तक्रार करूनही कारवाई नाही

शंकरपुर,दि 21 ः
येथून जवळच असलेल्या वाकर्ला येथील पांदण रस्त्याचा पुलिया एका शेतकऱ्याने फोडल्याने इतर शेतकऱ्यांना जाण्यायेण्या चा प्रश्न निर्माण झाला आहे वाकरर्ला ग्रामपंचायत अंतर्गत सुसुंद्री रिट येथे जाण्यासाठी रोजगार हमीतुन पांदन रस्ता बनविला रस्ता एक किलोमीटरचा असून या रस्त्यावरून जवळपास 15 शेतकरी जाणे-येणे करत असतात या रस्त्याचे पाणी बाजूने जाण्यासाठी वारंवार ग्रामपंचायतला तक्रार दाखल करून पुलिया बांधण्याची मागणी करण्यात आली परंतु ग्रामपंचायतीने याला प्रतिसाद न दिल्याने शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी करून हा पूल बांधण्यात आला या रस्त्याने शेतकरी आपले बैलबंडी व शेती उपयोगी साहित्य घेऊन आपली शेती करत होते परंतु मध्यरात्री रस्त्याच्या लगत असलेल्या भूषण सिंगारे या शेतकऱ्याने पुलिया फोडल्याने जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे त्यामुळे आता शेतकरी आपले साहित्य या रस्त्याने नेऊ शकत नाही याची तक्रार शंकरपूर येथे पोलीस चौकी चिमूर येथिल तहसीलदार यांना दिली असून अजून पर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली असून प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून हा पूल बांधून द्यावा अशी मागणी शेतकरी बी जे महाले व इतर शेतकऱ्यांनी केलेली आहे

Comments (0)
Add Comment