या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आपल्याला नावावर शेतजमीन करून घ्यावी लागणार आहे. अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांनी त्यांच्या नावावर शेतजमीन केलेली नाही. योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवरया नवीन नियमाचा परिणाम होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजेच हा नियम नवीन नियम नोंदणी करणाऱ्यांना लागू होईल.
आतापासून अर्जांच्या जागेचा भूखंड क्रमांक नवीन नोंदणी घेत असलेल्या अर्जदारांना द्यावा लागेल. ज्या लोकांचे संयुक्त कुटुंब आहे, त्यांना त्यांच्या मालकीची जमीन त्यांच्या नावावर करून घ्यावी लागेल. तरच या योजनेचा लाभ ते घेऊ शकतात. जर शेतकर्यांनी जमीन विकत घेतली असेल, तर त्यात कोणतीही अडचण येणार नाही.
हे ही वाचा – लाभदायक योजना – सुकन्या समृद्धि योजना – बालिका योजना
हे नक्की वाचा – वारसा हक्काने जमीन मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया
एखादा शेतकरी जर शेती करतो, पण शेतात त्याच्या नावावर आणि वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर जमीन नसेल तर त्याला वर्षाकाठीस 6000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्याच्या नावे जमीन असावी लागेल. एखादा शेतकरी दुसर्या शेतकर्याकडून भाड्याने जमीन घेतल्यास त्यालाही योजनेचा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांच्या नावावर जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पदावर जर असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही. याचा लाभ 10000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन असणाऱ्या सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना मिळणार नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया –
सर्वात पहिले तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
एक पेज ओपन होईल. त्यावर तुम्हाला FARMER CORNERS चा पर्याय दिसेल. त्यावर NEW FARMER REGISTRATION येईल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यात तुम्हाला आधार कार्ड आणि कैपचा टाकण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्हाला CLIk HERE TO CONTINUE वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुम्ही जर अगोदरच नोंदणी केलेली असेल तर तुमची माहिती येईल आणि जर नोंदणी केलेली नसेल तर ‘RECORD NOT FOUND WITH GIVEN DETAILS, DO YOU WANT TO REGISTER ON PM-KISAN PORTAL’ यावर तुम्हाला YES करावे लागेल.