पेट्रोल @ ९ ० रुपये लिटर सामान्यांचे कंबरडे मोडले

माजलगांव ,प्रतिनिधी:- कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत प्रत्येक गोष्ट महागच विकत घ्यावी लागली आणि आता थोडे थोडे अनलॉक होत असले तरी पेट्रोल , डिझेलची दरवाढ नित्याचीच बनली असून , पेट्रोलचा भाव नव्वद रुपये प्रतिलिटर झाला आहे . त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे .

दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वांचेच बजेट कोलमडले आहे . मागील तीन महिने कोरोनाच्या सावटाखालीच गेले . या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वसामान्यांना पेट्रोल मिळत नव्हते . पोलिस स्टेशनचा पास असणाऱ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल दिले जात होते . आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे तर पेट्रोल , डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे . सततच्या होणाऱ्या या दरवाढीमुळे वाहनचालक वैतागले आहेत . लॉकडाउनच्या काळात पेट्रोल , डिझेलचे दर स्थिर होते परंतु एप्रिल महिन्यामध्ये पेट्रोल , डिझेलच्या दरात एक रुपयाची वाढ झाली आणि दर वाढतच गेले . आता जून महिन्यामध्ये तब्बल दहा ते बारा रुपयांची दरवाढ पेट्रोल , डिझेलच्या लिटरमागे झाली आहे .

“शासनाकडून सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे दुचाकीमध्ये पेट्रोल टाकणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे . लॉकडाउनमध्ये वाहनात पेट्रोल महागड्या दराने बाहेरून घ्यावे लागले . आता पेट्रोल सुरळीत झाले परंतु मोठी दरवाढ यात झाली . वाहनामध्ये पेट्रोल टाकणे व महिन्याभराच्या बजेटमध्ये वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे .
– करण आंबुरे , विद्यार्थी .

छत्रपती राजर्षी शाहू महाराज., कृतीशील ,प्रगतीशील ,परिवर्तनशील राजे

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (1)
Add Comment