पोलिस, पत्रकारांबाबत डॉक्टरांकडून कृतज्ञता व्यक्त कोरोनाच्या धर्तीवर आरोग्य तपासणी करून समुपदेशन

माजलगांव, प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिस, पत्रकारांपूर्ती तालुक्यातील डॉक्टरांनी कृतज्ञता व्यक्त केली. इंडियन मेडिकल असोशिएशन, भारतीय आयुर्वेद संस्थेच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि.२४) पोलिस, पत्रकारांची आरोग्य तपासणी करून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी समुपदेशन करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिनाभरापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रस्त्यावरकाम करणाऱ्या पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांची शुक्रवारी (दि.२४) आरोग्य तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. यासाठी तालुक्यातील इंडियन मेडिकल असोशिएशन , भारतीय आयुर्वेद संस्थेने पुढाकार घेतला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत ढिसले, पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत, संतोष पाटील, सहायक निरीक्षक अविनाश राठोड, अनसूया माने, सोमनाथ नरके, आदींसह शंभर पोलिसांच्या कुटुंबांसह आरोग्य तपासणी करण्यात आली. काम करताना स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवून नेहमी ताजेतवाने राहण्यासाठी त्यांना मेडिकल किट वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून शारीरिक, मानसिक आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवायचे यासाठी उपस्थित पोलिसांचे समुपदेशनही करण्यात आले. यावेळी मेडिकल असोशिएशन, मिम संघटनेचे डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. शिवाजीराव काकडे, डॉ. अजय डाके, डॉ. सुनील गरड, डॉ. रंगनाथ गोळेकर, डॉ. युवराज कोल्हे, डॉ. सचिन डक, डॉ. राजेश रुद्रवार, डॉ. उद्धव नाईकनवरे, डॉ. शंकर जुजगर, डॉ. श्यामसुंदर काकाणी, डॉ. बिभीषण सोनवणे आदींनी सहभाग घेतला होता.

प्रतिकारशक्तीच्या जोरोवर कोरोनाला दूर ठेवता येते असल्याने शरीरात व्हिटॅमिन सी असणे गरजेचे आहे. यामुळे पोलिस, पत्रकारांनी दररोज सकाळी उकळलेल्या दोन अंड्याचा पांढरा भाग, दोन टोमॅटो खाल्यास प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाला दूर ठेवता येते.
– डॉ. यशवंत राजेभोसले, हृदयरोगतज्ज्ञ

Comments (0)
Add Comment