पुरंदर – पुरंदर-भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब मारुती जाधव यांची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे बदली झाली आहे. ३ वर्षापूर्वी अण्णासाहेब जाधव यांनी भोर उपविभागीय या ठिकाणचा कार्यभार स्वीकारला होता.त्यांनी या ठिकाणचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वांनाच विश्वासात घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचे काम केले. त्यांची बदली झाल्याने पुरंदर मधील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.सर्व सामान्य माणसाला आधार देणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.सर्वसामान्य घटकातील माणूस त्यांच्याकडे जाऊन आपल्या मागण्या मांडत होते.अनेक प्रकारचे गुन्हे त्यांनी या ठिकाणी उघडकीस आणले आहेत.सर्वांना विश्वासात घेऊन ते काम करत असत.
महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये समाधानकारक सेवा,कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्कार पोलीस यंत्रणेकडून सन्मान केला जातो. याप्रमाणे अण्णासाहेब मारुती जाधव यांनी गडचिरोली येथे पोलीस आणि जनता यांच्यामधील संबंध सुधारणे, सामाजिक उपक्रमात सहभाग, नक्षलविरोधी कारवाईत सहभाग यांसह अन्य सामाजिक,सांस्कृतिक उपक्रमात जाधव यांनी मोलाचे योगदान दिले.पोलीस प्रशासन व सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे.या त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना विशेष सेवापदक पुरस्कार देण्यात आला.गडचिरोली भागात केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना २०१८ मध्ये पोलीस महासंचालक यांचे ‘सन्मान चिन्ह’, २०१९ ला महाराष्ट्र शासनाचे ‘विशेष सेवा पदक’ आणि नुकतेच या वर्षी केंद्र शासनाचे ‘आंतरिक सुरक्षा पदक’ मिळाले.भीमा कोरेगाव येथे झालेली दंगल सुध्दा त्यांनी अत्यंत शिताफीने शांत केली होती.
अण्णासाहेब जाधव हे पुरंदर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक सलोखा व सर्वसामान्य नागरिकांना शांततापूर्ण व सुरक्षित वातावरण निर्माण करत गुन्हेगार प्रवृत्तीला आळा घालण्यात यशस्वी झाले. तसेच ते अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मदतीचा हात देत आहेत.एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा जिद्द, चिकाटी, कष्ट आणि आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार करणारे एक अभ्यासू, समाजशील, प्रेरणादायी, समाजशील, कर्तव्यदक्ष दबंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी चांगल्या प्रकारचे काम केले.गणेशोत्सव काळामध्ये एक गाव एक गणपती यासारख्या उपक्रम राबवून अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात आला होता.सर्वसामान्य नागरिकांना आधार वाटणारे त्यांची बदली झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांची बदली रद्द करण्याची मागणी सर्व सामान्य जनतेतून होताना दिसत आहे.आपल्या उत्तुंग कामगिरीमुळे अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले अण्णासाहेब जाधव सारखे अधिकारी सर्वसामान्यांसाठी वरदानच म्हणावे लागेल.