परभणी,दि 27 (प्रतिनिधी)ः
ममता कॉलनी व राजगोपालाचारी जलकुंभातून प्रभाग पाचमधील वसाहतीमध्ये नवीन पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी नगरसेवक सचिन देशमुख यांनी महापालीका आयुक्तांकडे केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील नागरीकांवर पाण्याच्या बाबतील अन्याय होत असल्याची तक्रार श्री.देशमुख यांनी केली आहे.ते म्हणातात, मागील सहा महिन्यांपासून महापालीकेतील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांशी तसेच एमजीपीच्या इंजिनीयर वारंवार सूचना करून सुद्धा ममता पाण्यात टाकीची व राजगोपालाचारीच्या नवीन वितरीत केलेल्या पाईपलाईनचे पाणी चालू करण्यासाठी आग्रहाने पाठपुरावा करत आहे. पण मागील सहा महिन्यापासून कोणतेही ठोस काम विशेषता ममता पाण्याच्या टाकीवर व राजगोपालचाऱ्या होत नाही त्याऐवजी पार्वती नगर ,एम आय डी सी व गावातील इतर टाक्यांचे काम करण्यात आले आहे. जाणून बुजून ममता पाण्याच्या टाकीचे काम हेतू पुरस्कृत मागे ठेवल्याचे दिसत आहे. गुत्तेदार व काही अधिकारी मुद्दाहून काम दिरंगाई करत आहे, असे जाणून येत आहे.
या प्रभागातील शिवराम नगर, कल्याण नगर, महसूल कॉलनी ,वैभव नगर ,आनंद नगर ,भाग्यनगर, येलदरकर कॉलनी, संत गाडगेबाबा नगर, ममता कॉलनी, संगम कॉलनी, सुयोग कॉलनी व्यंकटेश नगर, लोकमान्य नगर, यशोधन नगर, संत सेना नगर,कल्याण नगर,व इतर भाग जसे मंगलमूर्ती नगर,विकास नगर,गजानन नगर,दत्त नगर,आनंद नगर,रामदास नगर, वृंदावन कॉलनी, कृषी सारथी कॉलनी,संघमित्र कॉलनी, या भागातला पाणीपुरवठा ममता आणि राजगोपालचारी पाण्याच्या टाकीवरून आहे. राजगोपालचारी टाकीची टेस्टिंग झालेली असून सुद्धा त्यावर येणाऱ्या कल्याण नगर, महसूल कॉलनी, शिवराम नगर, संत दासगणू नगर ह्या भागातल्या नगरांमध्ये टेस्टिंग होऊन सुद्धा पाणी सोडले जात नाही, त्याउलट ह्याच पाण्याच्या टाकीवर असलेले रामकृष्ण नगर,विष्णुनगर, शिवाजीनगर या भागात पाणी सोडले जाते. असे निदर्शनास येते की एका टाकीतून दुसऱ्या वार्डात पाणी दिल्या जाते आणि प्रभाग पाचमध्ये दिल्या जात नाही. शहरामध्ये नळ कनेक्शन घेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला व आमच्या भागातील नागरिकांना नळकनेक्शन घेण्यास प्रवृत्त केले आणि ममता पाण्याच्या टाकीवर 65 किलोमीटर असलेल्या पाईप लाईन वर 80 टक्के नळकनेक्शन आम्ही घेऊन ठेवले आहे. तरीही नवीन पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन ची टेस्टिंग केल्या जात नाही त्याचा अर्थ काही वेगळाच दिसून येत असल्याचे देशमुख यांनी नमुद केले आहे.
तसेच या प्रभागात पाईपलाईन बाबतची खालील कामे करणे आवश्यरक आहेत-
1. कल्याण नगर येथे बेंबळकरव , पंढरपूरकर यांच्या घरासमोर, वैभव नगर येथे रासवे यांच्या घरापर्यंत, वसमत रोड शिवशक्ती अपार्टमेंट समोर,. मगदूम पुरा वांगी रोड ऑफिस भाई टेलर यांच्या घरासमोर, उघडा महादेव 100 फुटाचा रोड उघडा महादेव ते गाडगेबाबा नगर येथे नविन जलवाहीनी टाकली नाही.
येलदरकर कॉलनी मध्ये गेल्या दोन वर्षापासून घाण पाणी येत आहे त्याची दुरुस्ती करून देणे व नवीन पाईप लाईन चालू करून द्या करून देणे. यलरकर कॉलनीत पांचाळ ते जोशी यांच्या घरापर्यंत पाईपलाईन टाकली राहिली आहे.
प्रभागातील नागरिकांनी नवीन पाईप लाईन वर नळ कनेक्शन घेऊन सुद्धा त्यांना जुन्या पाईपलाईन चे घाण दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्याकरिता मान्य आयुक्तांना विनंती आहे की, यु. आय. डी. एस. एम. टी. व अमृत योजनेच्या गुत्तेदार यांच्या मनावर चालणारे अधिकार्यां्वर कारवाई करत ममता पाण्याच्या टाकीचे व राजगोपालचारी पाण्याच्या टाकीवरील नवीन पाईप लाईन एक महिन्याच्या आत लवकरात लवकर चालू करावे अन्यथा नागरिकांच्या संतापाचे रुपांतर आंदोलनात होईल असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
दरम्याण महापालीका आयुक्तांसह महापौर, उपमहापौर यांना सविस्तर माहिती सांगितल्यानंतर एक महिन्याच्या आत पाण्याच्या टाकीची पाईप लाईनला पाणी सुरु करण्याचे अश्वासन दिल्याचे देशमुख म्हणाले.