शब्दराज, ऑनलाईन टीम – कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन ‘जैसे थे’ च राहणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. काही प्रमाणात यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत शिथीलता आणण्यात येणार असली तरी जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच बस प्रवासावर जिल्हा बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवास करू इच्छिणार्यांना आता गेल्या लॉकडाऊनप्रमाणेच प्रवासासाठी ई-पास मागणी केल्यानंतरच प्रवासाला पोलिसांकडून दिला जाणार आहे.
राज्यांत लॉकडाऊन – 6 म्हणजेच राज्य सरकारच्या नव्या व्याख्येनुसार ’मिशन बिगीन अगेन’ला सुरुवात झाली आहे. यामुळे आता लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये सवलत देण्यात आली आहे. असे असले तरी प्रवासासाठी ई-पास आवश्यकच आहे. पण, लॉकडाऊनचे प्रवासाबाबतचे काही नियम शिथिल झाल्याने लोकांना ई-पास मिळवून आपापल्या गावी किंवा महाराष्ट्राबाहेर जाता येणार आहे.
कसा मिळवाल ई-पास?
महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार http://covid19.mhpolice.in वर E-Pass साठी अर्ज करता येतो. महाराष्ट्र पोलिसांच्या http://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला Apply for Pass Here पर्याय दिसेल. त्यावर विचारेलेली माहिती भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडा. सर्व माहिती दिल्यानंतर Submit बटन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. पास मंजूर झाल्यानंतर तो http://covid19.mhpolice.in वर मिळेल.
राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; राज्यातील ‘या’ शहरांत कडक निर्बंध
Read More – कोरोनाने रोखली वारकऱ्याची वाट अनेक वर्षांची परंपराखंडित झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड
तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पून्हा सुरू केले शुटिंग
Read This – ‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा