वैजापूर, प्रतिनिधी – राज्या मध्ये आज जी कोरोना ची महामारी पसरली असून सर्व सामान्य जनतेच्या हाताला काही काम नाही अशा परिस्थितीत मायक्रोफायनान्स बँक ,बचत गट,महावितरण चे वीज बिल हे सदरील काळातील परिस्थिती चा विचार करुन माफ करण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) वैजापूर च्या वतीने उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना देण्यात आले होते.
या निवेदनात पुढे आज घडीला संपूर्ण देशाचा नव्हे तर सर्व जगाचा आर्थिक गाडा थांबलेला आहे अशा परिस्थिती सर्व सामान्य जनतेला कसलाही सहारा उरलेला नाही काही लोकांचा हातावर व्यवसाय आहेत मायक्रोफायनान्स च्या बचत गटांच्या माध्यमातून कर्ज मिळवून व्यवसाय करतात आशा परिस्थितीत त्यांच्या समोर त्याचे घर चालवायचे की व्याजाचे हफ्ते भरायचे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्या मागो माग शाळांनी देखील उरलेली फी भरा अन्यथा तुमच्या पाल्याचा निकाल राखून ठेवला जाईल ही भूमिका घेतली आहे हे संकट संपत नाही की लगेच वीज बिलाची मागणी करण्या करिता वीज कंपनी चे तगादे सुरू झाले आहे.आशा परिस्थिती सरकारने सर्व सामान्य जनतेचा आर्थिक विचार करावा व सरसगट या काळातील व्याजाचे हफ्ते वीज बिल शाळेची फी माफ करावी अशी मागणी त्यांनी मागे केली होती.
परंतु बजाज मायक्रोफायनान्स या फायन्सने वसुली सुरूच ठेवली होती या अनुषंगाने आर पी आय च्या वतीने आज शहरातील ठक्कर बाजार येथील कार्यालयाला कुलूप लावले या वेळी शहर अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, प्रवीण गायकवाड,संजय उबाळे,अमोल साळवे प्रवीण शिंदे ,कंतीदास पेटारे आकाश भाटे ,दीपक फाळके आदी आंदोलनात उपस्थित होते.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});