सुरगाणा,दि 05 (प्रतिनिधी)ः विवेकानंद करिअर ॲकडमी सोमेश्वरनगर, बारामती जि.पुणे यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत (५०००मी) खुल्या गटात सुरज लक्ष्मण खोटरेने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सुरज हा आदिवासी भागातील उंबरठाण ता. सुरगाणा जि.नाशिक येथील रहिवासी आहे. सुरजच्या या यशाबद्दल नाशिक जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सुरजची या पुर्वी एकदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तसेच सुरजने विविध मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे सुरजला ग्रामस्थांनी ‘उंबरठाण एक्सप्रेस’ असे नाव दिले आहे.
कोविड काळात सुरगाणा तालुक्यातील नैसर्गिक परिस्थितीचा फायदा घेऊन डोंगर दर्यामध्ये आपल्या सहकार्यांना घेऊन सुरजने थविल सर यांच्या मार्गदर्शनाखाली धावण्याचा सराव केला. उंबरठाण परिसरातील तरूणांना सोबत घेतले. सुरजकडून प्रेरणा घेऊन उंबरठाण गावातील शालेय विद्यार्थी तसेच तरूण तरूणी उंबरठाणमध्ये धावपट्टी बनवून सराव करत आहेत.
सुरजचा हा आदर्श, यश नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व धावपटूंनी घेऊन भरपुर सराव, मेहनत करून यश संपादन करावे.
सुरजच्या या यशाबद्दल उंबरठाण ग्रामस्थ मधूकर खोटरे, माधव पवार, सुरेश चौधरी, सिताराम पवार, यशवंत जाधव, गोपाळ पवार, रमण जाधव आदींनी सुरजचे आणि वडील लक्ष्मण खोटरे यांचे अभिनंदन केले.