बाहेरून आलेल्या नागरिकांनी आपली नोंद स्वतःहून प्रशासनाकडे करावी

नागरिकांमध्ये होत आहे भीतीचे वातावरण-प्रा. पवन मुंडे

परळी, प्रतिनिधी – राज्यात कोरोना चा वाढता आकडा पाहता सर्वत्र चिंतेचे वातावरण झालेले असतांना परळीत मुंबई, पुणें व इतर ठिकाणाहून काही लोक शहरात गपचिप प्रवेश करून वास्तव्य करत आहेत,त्या मुळे त्या-त्या परिसरातील लोक भयभीत होत आहेत तरी बाहेरून आलेल्या लोकांनी आपली स्वतःहून प्रशासनाकडे ऑनलाइन नोंद करावी व पुढील सूचनांचे पालन करावे असे आवाहन बाहेरून आलेल्या लोकांना नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे
अचानकपणे बाहेरगावातून आलेला नवीन व्यक्ती आपल्या वस्तीत दिसला की त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे , कोरोना च्या पार्श्वभूमीवर अचानक काही लोक गुपचिप पणे प्रशासनाला न कळवता प्रवेश करत आहेत या मुळे त्यांच्या स्वतःच्या जिवा बरोबर त्यांच्या कुटुंबाचा व परिसरातील लोकांना कोरोनाच्या भीतीने जीव भांड्यात पडत आहे, लोक घाबरत आहेत तरी अचानक आलेल्या लोकांनी नगरपरिषद किंवा तहसीलदार यांच्या कडे आपण कोठून कधी आलो याची नोंद करावी व प्रशासनाच्या पुढील सूचनांचे पालन करून कोरोना च्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे , तसेच आपल्या परिसरात नवीन व्यक्ती आला असेल त्यानी प्रशासनाला कळवले नसेल तर आजूबाजूच्या नागरिकांनी न संकोचता प्रशासनाला कळवावे असे आवाहन नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे

Comments (0)
Add Comment